कोल्हापूर : निसर्ग पुरक संवर्धन आणि प्रंचड प्रमाणात आथिक बचत करणारी सौर ऊर्जा वापरासाठी समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेची आहे.यात समाजकार्यासह नियोजन ही होतेच ,या संदर्भात कार्यरत आदित्य सृष्टी सोलर शोरुम च्या भविष्यात तालुका गावपातळी पर्यंत शाखा सुरु व्हाव्यात अश्या शब्दात खासदार धनंजय महाडीक यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.शाहूपुरी तिसऱ्या गल्लीत त्यांचे हस्ते यांचा शुभारंभ झाला.गेली अठरा वर्षे सौर ऊर्जा वापर क्षेत्रात कार्यरत आदित्य सृष्टी चा हे माहीती – प्रबोधन करणारे शोरुम हा महत्त्वाचा टप्पा आहे, अश्या शब्दात बांधकाम व्यावसायिक क्रीडाई चे ऊपाध्यक्ष राजीव पारीख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.या वेळी शुभेच्छापर मनोगते यात मेडा चे महाप्रंबधक रविंद्र कोलप,क्रीडाई जिल्हा अध्यक्ष महेश यादव यांनी व्यक्त केली. प्रांरभी सौर ऊर्जा चा विविध पैलूनी वापर या विषयी केतकी कोप यांनी माहीती दिली. तर गत अठरा वर्षाच्या प्रगतीचा आढावा विवेक कोप यांनी घेत सौर ऊर्जा वापर प्रबोधनासाठी आगमी काळात गणेशोत्सवमंडळे व स्वंयसेवी संस्थाना ही सहभागी करुन घेणार असल्याचे सांगितले.आभार वैदही जोशी यांनी मानले.या सोहळ्यास परेश नाईक,अविकल मिश्रा यांचे सह बांधकाम,सौर ऊर्जा वापर – निसर्ग संवर्धन क्षेत्रांतील विविध संस्थाचे मान्यवर पदाधिकारी ऊपस्थित होते.

Leave a Reply