आज प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रफितीमध्ये भारतातील पश्चिम बंगालमधील मनेभंजंग येथील रहिवाशांनी संदाकफु गावापर्यंत आपल्या जीवनमानासाठी केलेल्या ३१ किलोमीटरच्या नेत्रदीपक प्रवासाची क्षणचित्रे दाखविण्यात आली आहेत.समुद्रसपाटीपासून ३६३६ मीटर उंचीवरवसलेल्या आपल्या गावात जाण्यासाठी उत्तुंग चढ असलेले रस्ते, खडकाळ निरुंद मार्ग आणि अत्यंत अनिश्चित, फसवे हवामान अशा अडचणी आणि धोक्यांना येथील रहिवाशांना आणि त्यांच्या लँड रोव्हर गाड्यांना दररोजसामोरे जावे लागते.लँड रोव्हर आपल्या ७० व्या वर्धापनदिनाच्यासोहळ्याला अधिक उत्तुंग उंचीवर नेण्यासाठी अतिशय तंदुरुस्त असलेल्या आपल्या क्लासिक मॉडेल्सचा ताफा घेऊन पश्चिम बंगालमधील दुर्गम ग्रामीण भागाला भेट देणार आहे.
‘लँड रोव्हरचा भूप्रदेश (लँड ऑफ लँड रोव्हर)अशा नावाने ओळखले जाणारे हे हिमालयाच्या खोल भागातील ग्रामीण ठिकाण पार १९५७ सालापासून लँड रोव्हरच्या अत्यंत काटेकोरपणे देखभाल केलेल्या वाहन मालिकांच्या ताफ्यावर अवलंबून आहे.सर्व खडतर प्रदेशातील दळणवळणासाठी एक विश्वसनीय आणि अखंडित माध्यम म्हणून येथील समुदायाकरता महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या त्यांच्याजवळील वाखाणण्याजोग्या सिरीज मॉडेल्सच्या कलेक्शनला लँड रोव्हरच्या चमूने भेट दिली.
इ.स. १९४८ मध्ये अॅमस्टरडॅम मोटर शोमध्ये मूळ लँड रोव्हर सर्वप्रथम सादर झाली होती.यंदाच्या वर्षी त्याला ७० वर्षे पूर्ण झाली आहेत.हा महत्वपूर्ण टप्पा साजरा करण्यासाठी २०१८मध्ये संपूर्ण वर्षभर लँड रोव्हरने विविध कार्यक्रम आणि सोहळ्यांची मालिकाच आयोजित केलेली असून एक खास दूरचित्रवाणी प्रसारण (ब्रॉडकास्ट), विक्रमी संख्या असलेला वाहनांचा ताफा आणि लंडनच्या डिझाइन म्युझिअममध्ये प्रदर्शनआदींचा त्यामध्ये समावेश आहे.
चित्रफित पाहण्यासाठी येथे भेट द्या:https://youtu.be/YNXU1IR2LR8
Leave a Reply