कोल्हापूर : रेडिओ सिटी हे भारतातील नावाजलेले रेडिओ नेटवर्क असून आज त्यांनी देशातील आपल्या सर्वात मोठ्या रॅलको प्रस्तुत रेडिओ सिटी सुपर सिंगर टॅलेंट हंट स्पर्धेची घोषणा केली आहे.रेडिओ सिटी देशातील ३९ शहरांमधून सर्वोत्तम गायक शोधणार आहेत या स्पर्धेत अनोखे विक्रम आणि श्रोत्यांचा विश्वास जिंकतानाच हरजोत कौर,मान्या सारंग ,श्रीगणेश यांच्यासारख्या प्रभावी गायकांना प्रकाशात आणले आहे.हा कार्यक्रम गेली दहा वर्षपासून सुरू आहे.या दहाव्या सिझनसाठी ऑडीशन्स सुरू आहेत या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या २ सप्टेंबर रोजी कोल्हापूरमध्ये होत आहे.येथील डीवायपी सिटी मॉलमध्ये सर्वोत्तम ५ स्पर्धकांमधून विजेतेपदाचा मुकुट मिळविण्यासाठी लढत होणार आहे.
रेडिओ सिटी सुपर सिंगर ही दीर्घकाळ चालणारी स्पर्धा असून त्यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी अनोखा आणि बहारदार अंदाज सादर केला जातो आहे.रेडिओ सिटीचा हा भरगच्च कार्यक्रम असून डिजिटल माध्यम,रेडिओ प्रसारण आणि प्रत्यक्ष प्रचार यंत्रणेद्वारे तो सर्वांपर्यंत परिपूर्णपणे पोहोचविला जातो.यावर्षीच्या सत्रात हे प्रसारण ६.७ कोटी श्रोत्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.त्यामध्ये देशभरातील स्पर्धकांना त्यांचे टॅलेंट दाखविण्याची एक सशक्त यासपीठ मिळणार आहे.यातील यशस्वी स्पर्धकांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळविले आहे.
रेडिओ सिटीचे चिफ क्रिएटिव्ह ऑफिसर कार्तिक काल्ला यांनी सापर्धेविषयी बोलताना रेडिओ सिटीची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन सिटीने नाविन्यता जोपासली आहे.अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळवून नवोदितांना या इंडस्ट्रीत ओळख मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.तर रेडिओ सिटीचे अभिनंदन करताना अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी आपल्या देशात अनेक प्रतिभाशाली गायक आहेत त्यांना रेडिओ सिटीसारखे व्यासपीठ मिळणे ही सर्वोत्तम बाब आहे असे सांगितले.
Leave a Reply