Uncategorized

लव्ह-हेट रिलेशनशीपची गोष्ट सांगणारं  ‘छत्रीवाली’मालिकेचं धमाल शीर्षकगीत

September 30, 2018 0

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकवर्गातून भरभरुन दाद मिळताना दिसतेय. अश्विनी शेंडे-बगवाडकरच्या लेखणीतून हे शीर्षकगीत तयार झालं असून नीलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलंय. टिकोजीराव ऐदी… आड येते ही छत्रीवाली असे धमाल शब्द असलेल्या या गाण्याला तरुणाईकडून […]

Uncategorized

‘फिल्मफेअर २०१८’ मध्ये ‘रिगण’ने पटकावले पाच पारितोषिक 

September 30, 2018 0

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारास पात्र अश्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती करणाऱ्या विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सच्या शिरपेचात, आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण, यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात लॅन्डमार्कच्या ‘रिंगण’ या सिनेमाने तब्बल पाच सर्वोत्कृष्ट पुरस्कारांवर आपले नाव कोरले. ज्यात […]

Uncategorized

आंतरराष्ट्रीय बैठकीवेळी पोलंडच्या शिष्टमंडळाने जागवली कोल्हापूरची आठवण

September 30, 2018 0

बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या  आशिया-युरोप संसदीय सहयोगी बैठकीत राज्यसभेचे खासदार संभाजीराजेछत्रपतींना पोलंडच्या शिष्टमंडळाने सुखद आश्चर्याचा धक्का दिला.  या बैठकीला पोलंडचे शिष्टमंडळही उपस्थित होते आणि त्यात पोलंडच्या सिनेटचे उपसभापती बॉग्डॅन बोरूसेविक्झी यांचा […]

Uncategorized

विसर्जन मिरवणुकीत महापौर, उपमहापौर यांना धक्काबुक्की

September 23, 2018 0

कोल्हापूर : मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या सुरवातीलाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकांनी महापौर शोभा बोन्द्रे आणि उपमहापौर महेश सावंत यांना धक्का बुक्की केली. या प्रकाराचा महापौर व उपमहापौर यांनी […]

Uncategorized

भागीरथी संस्थेच्या वतीने झिम्मा-फुगडी आयोजन ; ५ लाखांची बक्षिसे: अरुंधती महाडिक

September 20, 2018 0

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं दरवर्षी झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या वर्षी बुधवार, ३ ऑक्टोबर रोजी, मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं झिम्मा – फुगडी स्पर्धा रंगणार […]

Uncategorized

गणेशोत्सवात प्रत्यक्ष भेटणार अगडबम ‘नाजुका’

September 16, 2018 0

विघ्नहर्त्याचा आशीर्वाद लाभला की, पुढचा मार्ग सहजसोपा होतो असे म्हणतात. त्यामुळे अनेकजण आपल्या कामाची सुरुवात गणपती उत्सवापासून करणे पसंत करतात. आपल्या सर्वांच्या लाडक्या नाजुकानेदेखील आपल्या आगामी सिनेमाची दमदार सुरुवात या दिवसांपासून केली आहे. पेन इंडिया लिमिटेड कंपनीचे […]

Uncategorized

झी टॉकीज आयोजित महाराष्ट्र कुस्ती लीग’ महाराष्ट्राची ‘दंगल’

September 13, 2018 0

‘आपलं टॉकिज झी टॉकिज’ असं म्हणत गेली अकरा वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘झी टॉकिज’ ही वाहीनी आता ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’ या आधुनिक स्वरूपाच्या कुस्तीस्पर्धेसाठी सज्जहोत आहे. अनेक दिग्गज कुस्तीपटू यात सहभागी होत असून त्यामुळे कुस्ती प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहे. भारताला मैदानी खेळांची खूप मोठी परंपरा आहे. हॉकी हा भारतचा राष्ट्रीय खेळ जरी असला तरीही ब्रिटिशांनी भारतावर सत्ता स्थापन केल्यापासून त्यांचा राष्ट्रीय खेळ क्रिकेट इकडे आणलाआणि तो लोकप्रियही केला. कोणताही मैदानी खेळ, मग तो सांघिक असो वा वैयक्तिक, तो त्या खेळाडूची शारीरिक क्षमता तर तपासतोच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो खेळ त्या खेळाडूचीमानसिक सक्षमताही पडताळून पाहतो. कुस्ती हा असाच एक मैदानी खेळाचा प्रकार. यात शारीरिक क्षमतेसोबतच कुस्तीपटूची मानसिकताही खेळाच्या निकालावर किती परिणाम करू शकते याचा प्रत्यय येतो. कधी कधीखेळताना अशी एखादी परिस्थिती उद्भवते, की त्यावेळी घेतलेल्या निर्णयानं सामन्याचा जो निकाल लागेल त्यावरून खेळाडूंची मानसिकता समजते.कोल्हापूरचे तत्कालीन राजे छत्रपती शाहू महाराजयांचाही कुस्ती हा आवडीचा खेळ. त्यांनी आपल्या कार्यकाळात कुस्तीच्या प्रचार व प्रसाराला खूप महत्त्व दिलं. तसंच त्यांनी कुस्तीला राजाश्रयही दिला. त्यांच्या याच सकारात्मक पावलांमुळे कुस्तीखेळण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुस्तीपटू कोल्हापूरला विविध कुस्तीस्पर्धांमध्ये सहभागी व्हायला येत असत. तसं पाहायला गेलं तर पूर्वी खेळल्या जाणाऱ्या कुस्तीच्या सामन्यांसाठीपंच नसायचे,  तर त्या स्पर्धेला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणेच पंचांची भूमिका पार पाडायचे. मात्र आधुनिक स्वरूपातल्या या खेळाला पंच म्हणजेच रेफरी आवर्जून असतात. कुस्तीचे नियम अत्यंत साधे असतात. भरपूर माती असलेल्या आखाड्यात दोन खेळाडू म्हणजेच पहलवान एकमेकांसमोर उभे ठाकतात. एकमेकांना हात मारायची त्यांना परवानगीनसल्यानं केवळ ताकदीच्या जोरावर विविध पद्धतींनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर टेकवायचं आणि सामना जिंकायचा, हाच उद्देश त्यांच्या मनात असतो. आता हीच कुस्ती कात टाकून तीमातीऐवजी मॅटवर खेळली जाते. मातीत खेळल्या जाणाऱ्या कुस्तीपेक्षा मॅटवर खेळली जाणारी कुस्ती आधुनिक स्वरूपाची असून तिला आता ‘ग्लॅमरस व कॉर्पोरेट लूक’ आला आहे. आतापर्यंत अनेकदिग्गज खेळाडूंनी कुस्तीमधून आपलं क्रीडा कार्यक्षेत्र फुलवलं आहे. यात महाराष्ट्रातील खाशाबा जाधव यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. १९५२ साली हेलिसिंकी येथे झालेल्या उन्हाळीऑलिम्पिकस्पर्धांमध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवलं आणि ऑलिम्पिकस्पर्धांमध्ये पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. त्याचप्रमाणे सध्याचा विचार केला तर योगेश्वर दत्त, सुशीलकुमार यांनीहीआंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये भारतातर्फे कुस्तीचं प्रतिनिधित्व करून पदकांची कमाई केली आहे. भारतीय महिला कुस्तीपटूही या खेळात कुठेच मागे नाहीत, याचं उत्तम उदाहरण म्हणजेसाक्षी मलिक व गीता फोगाट.याच कुस्तीला आता प्रत्येक दर्शकापर्यंत पोचवण्यासाठी महाराष्ट्राची अग्रणी चित्रपट वाहिनी ‘झी टॉकिज’ मैदानात उतरत आहे. ‘आपलं टॉकिज झी टॉकिज’ असं म्हणत दि. २५ ऑगस्ट२००७  रोजी दाखल झालेल्या या वाहिनीनं जुने-नवे मराठी चित्रपट दाखवून प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन केलंच आहे. त्याचप्रमाणे अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मितीही या वाहिनीनं केली असून त्यांनाप्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता ‘झी टॉकिज’ ही वाहिनी ‘महाराष्ट्र कुस्ती लीग (MKL)’ या आधुनिक कुस्तीस्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीच्या आखाड्यात उतरायला सज्ज झाली आहे. दि२ नोव्हेंबर २०१८ ते १८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार असून त्यात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज पुरुष व महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. पुण्याच्याश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हणजेच बाळेवाडी मैदनावर ही स्पर्धा पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तिपरिषद व अखिल भारतीय कुस्ती महासंघ यांच्याशी ही स्पर्धा संलग्न आहे. ‘झी’ फक्तमनोरंजन क्षेत्रात कार्यरत नसून भारतीय खेळांना सहकार्य व प्रगतिकारक वाटचालीसाठीही प्रेरणा देत आहे.महाराष्ट्र कुस्ती लीग’ हा याचाच एक भाग आहे. तेव्हा तयार राहा या आगामी ‘दंगल’साठी.महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की , झी टॉकीज आयोजित महाराष्ट्र कुस्ती लीग मुळे महाराष्ट्रातील आणि भारतातील कुस्तीखेळडूंना  आर्थिक सहाय्य होईल. विशेषतः या लीगमुळे महिला खेळाडुंना याचा फायदा होईल. ही लीग खेडयापाडयात पोहचेल आणि पालक कुस्ती खेलाबाबत अधिक जागरूक होतील. या लीगमुळेखेळाडुंना आपल्यातील प्रतिभा दाखवणयासाठी एक नवे व्यासपीठ मिळेल. या खेळाला आर्थिक मदत मिळाल्यानं खेळाडू आणि खेळडूंना खूप मदत होईल. या लीगकडून खूप अपेक्षा आहेत. आगामी२०२० ओलिम्पिकच्या दृष्टिनं ही लीग महत्वाची ठरणार आहे. या लीगद्वारे महाराष्ट्राच्या खेळाडूची ओलिंपिकसाठी निवड होण्यासाठी मदत झाली तर खूप बरं होईल.झी टॉकीज आणि झी युवाचे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, भारतीय खेळाला पाठिंबा देणे आणि त्याच बरोबर कुस्ती सारख्या खेळातुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल बनवणे हेचमहाराष्ट्र कुस्ती लीग चे मुख्य उद्दिष्ट आहे. याबरोबरच आपल्या कुस्तीवीरांना त्यांच्या खेळाचा उत्तम आर्थिक मोबदला मिळणे व  कुस्तीवीरांच्या खेळाचा दर्जा उंचावणे हे ही तेवढेच महत्वाचे आहे . यासर्व गोष्टीची योग्य दखल झी टॉकीज घेत आहे.महाराष्ट्र कुस्ती लीग’ द्वारे  राज्यस्तरीय , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा उत्तम खेळ प्रेक्षकांना पहायला मिळेल.

Uncategorized

 ‘रंकाळावेस गोल सर्कल’च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम

September 12, 2018 0

कोल्हापूर: गेली पाच वर्षे विविध सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा रंकाळा वेस गोल्ड सर्कल मित्रमंडळाने जोपासली आहे. यावर्षीही ही परंपरा पुढे चालवीत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबिर, दंतचिकित्सा, स्वाइन फ्लू […]

Uncategorized

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त चरित्रग्रंथाचे प्रकाशन

September 12, 2018 0

 कोल्हापूर: थोर स्वातंत्र्यसेनानी देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूट व गांधी तत्त्व प्रसार केंद्र यांच्यावतीने डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन व विविध क्षेत्रात समर्पित […]

Uncategorized

स्पर्धा परीक्षांर्थींसाठी लोकराज्य उपयुक्त:उपजिल्हाधिकारी

September 12, 2018 0

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षांर्थींसाठी लोकराज्य उपयुक्त ठरत असून कृषी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी लोकराज्यचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय आणि राजर्षि शाहू महाराज कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने […]

1 2 3 4
error: Content is protected !!