
कोल्हापूर: लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीचा थरार आज दसरा चौक येथे पहायला मिळाला. गडहिंग्लज च्या संघर्ष ग्रुपने 3 लाखाची दहीहंडी फोडली.सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध उपक्रम राबवणार्या धनंजय महाडिक युवा शक्तीने, गेली ८ वर्षे दहीहंडीचा उपक्रम यशस्वी पणे राबवला आहे. यंदाही युवाशक्ती दहीहंडी स्पर्धा आयोजित केली होती. कोल्हापुरातील दसरा चौक मैदान येथे तब्बल ३ लाख रूपयांची दहीहंडी फोडण्यासाठी, गोविंदा पथकांची चुरस रंगली.आधी 10 फूट, नंतर 5 फूट आणि दोन वेळा 6 इंच इतकी उंची कमी करण्यात आली. यावेळी सात थर लावत सोमनाथ नाईक या गोविंदा ने दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावतीने दहीहंडी स्पर्धेमधील विजेता संघर्ष ग्रुप या गोविंदा पथक संघाला रोख ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले.आणि सोमनाथ नाईक ला 15 हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.
तसेच पाच थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला ७ हजार रूपये आणि सहा थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला १२ हजार रूपयांचे पारितोषिक दिले.तसेच सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणार्या गोविंदाच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आली होती.
दरवर्षीप्रमाणे प्रशस्त अशा दसरा चौक मैदानावर दहीहंडीसाठी शिस्तबध्द नियोजन केले होते. सार्थक क्रिएशनच्या कलाकारांचा नृत्याविष्कार आणि श्रीमंत ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण करण्यात आले. तर डी जे रणजित आपल्या कलाकौशल्यातून तरुणाईला नाचवले. युवाशक्ती दहीहंडीच्या उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आ.अमल महाडिक आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले.
Leave a Reply