मारुती सुझुकीच्या 10व्या दक्षिण डेअर रॅलीचा बंगळुरूमध्ये फ्लॅग ऑफ

 

बंगळुरू:-बहुप्रतिक्षित 10व्या 2018 मारुती सुझुकी दक्षिण डेअर स्पर्धेला आज बंगळुरूमधील ओरियन मॉलपासून मोठ्या थाटामध्ये सुरुवात झाली. बंगळुरूमध्ये सुरू झालेली ही 2,000 किमी लांब रॅली 8 सप्टेंबरला गोव्यात संपन्न होणार आहे, या स्पर्धेदरम्यान 5 खडतर दिवसांमध्ये प्रत्येक चालकाचे कौशल्य, वेग आणि साहस यांचा कस लागणार आहे आणि देशभरातील मोटारस्पोर्टच्या चाहत्यांना खिळवून ठेवणार आहे. दक्षिण भारतातील ही सर्वात खडतर आणि आकर्षक रॅली पूर्वीच्या पोर्तुगीज राजवटीमधील गोव्याच्या नयनरम्य प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील धोकादायक भूप्रदेशातून मार्गक्रमण करणार आहे, गोव्यातच स्पर्धेच्या जेत्याला विजेतेपदाचा मुकुट घातला जाईल. या रॅलीला कर्नाटकच्या पर्यटन विभागाचा अधिकृत पाठिंबा आहे आणि कर्नाटकचे पर्यटनमंत्री श्री. स. रा. महेश यांनी या स्पर्धेला फ्लॅग ऑफ दिला. 

या वर्षी अल्टिमेट कार, अल्टिमेट बाईक आणि एन्ड्युरन्स कार या तीन वर्गातील 140 पेक्षा जास्त मोटारस्पोर्ट स्पर्धकांनी भाग घेतला आहे. त्यांचा आनंद व्यक्त करतांना, श्री आर.एस. कलसी, सीनियर एक्झेक्युटिव डायरेक्टर, मार्केटिंग अँड सेल्स, म्हणाले, “मारूती सुझुकी साठी हे वर्ष अत्यंत खास आहे कारण की दक्षिण डेअर ने ऐतिहासिक दहा वर्षांचा टप्पा साध्य केला आहे. ज्याची विनम्र सुरवात दहा वर्षांआधी फक्त 20 प्रतिस्पर्धी टीम्स सोबत झाली होती, ती आज 80 टीम्स सोबत मोटरस्पोर्ट रिंगणात सर्वाधिक शक्तिशाली आणि विश्वसनीय पैकी एक म्हणून उभी आहे. महिला स्पर्धकांच्या संख्येत आम्ही भपकेदार वाढ पाहिली आहे कारण की व्हीलच्या मागे त्यांचे कौशल्या दाखविण्यासाठी त्या पुरुषांच्या समकक्ष जाण्यास तयार आहेत. मोटरस्पोर्ट मध्ये नाविन्य जोपासण्यासाठी आणि उत्तेजना आणण्यासाठी मारूती सुझुकी चिकाटीने कार्य करीत आहे. ह्या वर्षी, वेस्टर्न घाट मधून नवीन रॅली रूट प्रारंभ करून, आमच्या स्पर्धकांना आम्ही एक उल्हासित करणारा अनुभव देणार आहोत ह्याची आम्हाला खात्री आहे.”
गतवर्षीचा विजेता सुरेश राणा अल्टिमेट कार श्रेणीमध्ये टीम मारुती सुझुकी मोटारस्पोर्टतर्फे या रॅलीमध्ये उतरला असून विजेतेपदासाठी देशभरातील मजबूत प्रतिस्पर्ध्यांशी लढा देणार आहे. व्हिटारा ब्रेझा आणि एस क्रॉस यांची अल्टिमेट कार श्रेणीमधील उपस्थितीदेखील जाणवणार आहे. टीम मारुती सुझुकी मोटारस्पोर्टमध्ये व्हिटारा ब्रेझा, एस क्रॉस आणि ग्रँड व्हिटारा यांच्यामध्ये सुरेश राणा, संदीप शर्मा, सम्राट यादव आणि धरमपाल जांग्रा अशा दिग्गजांचा समावेश आहे.
Motorsport.inc हा जयदास मेनन यांच्या नेतृत्वाखालील बंगळुरूमधील क्लब असून तो दक्षिण डेअरच्या या आणि पूर्वीच्या सर्व स्पर्धांसाठी वर्षासाठी मारुती सुझुकीचा मोटारस्पोर्ट क्लब भागीदार आहे. फ्लॅग-ऑफ समारंभाच्या एक दिवस आधी सहभागींच्या वाहनांची कठोर छाननी तपासणी केल्यानंतर त्यांना मंजुरी मिळाली आहे. या रॅलीचे आव्हानात्म स्वरूप पाहता, सर्व सहभागींना रॅलीदरम्यान नियमित कालावधीने ऑन ग्राउंड सुरक्षा उपाय प्रदान करण्यात आले आहेत. सहभागींच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या मार्शलच्या देखरेखीखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

  मारूती सुझुकीची दक्षिण डेअर रॅली ही दक्षिण भारतातील सर्वात मोठया मोटारस्पोर्टपैकी एक आहे
ही रॅली बंगळुरू-दावणगिरी-कोल्हापूर या मार्गाने जाऊन गोव्यामध्ये संपन्न होईल . 6 दिवसांच्या कालावधीत 80 संघांमधील 140 पेक्षा जास्त सहभागी स्पर्धक सुमारे 2000 किमी अंतर पार करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!