पूरपरिस्थितीत सापडलेल्या केरळला कोल्हापूरचा मदतीचा हात

 

कोल्हापूर: महाप्रलयाचे अस्मानी संकट केरळवर कोसळले. या संकटात सापडलेल्या केरळ बांधवांच्या मदतीसाठी कोल्हापूरकर सरसावले. सिद्धगिरी मठाचे परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या आवाहनानंतर कोल्हापुरातील सर्व बंधू भगिनी, सामाजिक संस्था यांनी वेगवेगळ्या स्वरूपात मदतीचा ओघ सुरू केला. अन्नधान्य, कपडे, ब्लॅंकेट, औषधे, भांडी जनावरांचे खाद्य, चारा इत्यादी मदत दिली. साखर कारखान्यांनीही मदत दिली. जवळजवळ चारशे टन इतकी मदत गोळा झाली. स्वामीजी,व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, उजवल नागेशकर यांच्या मार्गदर्शनाने 18 ऑगस्टला कोल्हापुरातून पहिली टीम रवाना झाली. कोट्टायम, वायनाड, अलेप्पी, पेरबापुर या चार जिल्ह्यांमध्ये मदत अजिबात पोहोचली नव्हती. या ठिकाणी जाऊन मदतीचा ओघ वाढवण्यात येत होता. पूरग्रस्तांसाठी तात्काळ औषधोपचार व रिलीफ सेंटर ला सुरुवात करण्यात आली वैद्यकीय पदकापासून अनेक स्वयंसेवक येथून त्या मदत कार्यामध्ये सहभागी होत होते. गरजेप्रमाणे वेगवेगळी औषधे अन्नधान्य कपडे मुलांसाठी वह्या-पुस्तके जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात होत्या.
तब्बल 22 लाख रुपयांची औषधे कोल्हापूर मधून नेण्यात आली. आणि तेथील लोकांना एक महिना पुरतील एवढी औषधे देण्यात आली आहेत असे डॉ. शितल पाटील यांनी सांगितले.
100 हून अधिक स्वयंसेवकांची टीम 15 डॉक्टरांची टीम प्रत्यक्ष आपत्तीग्रस्त जिल्ह्यामध्ये जाऊन मदत पुरवत होती. त्यामध्ये घरांची, देवळांची स्वच्छता, बचत कार्य, मदत कार्य करण्यात येत होते. ओनम हा केरळचा सर्वात मोठा व प्रसिद्ध सण. हा उत्सव व सणासाठी केरळवासियांना यावर्षी कठीण होते. तेव्हा प्रत्येक घरी या सणासाठी आपल्या स्वयंसेवकांनी अन्नधान्याचा पुरवठा केला. अहोरात्र स्वयंसेवक तिथे कार्यरत होते. मदतीबरोबरच तिथे जाऊन तिथल्या संकटात सापडलेल्या केरळवासियांना दिलासा देण्याचे काम कोल्हापूरने केले. पुन्हा एकदा देशात कुठल्याही राज्यावर संकट आले तरी कोल्हापूरकर हे नेहमीच तत्पर असतात आणि आपली दानशूरता हा गुण दाखवून देतात हे सिद्ध झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!