
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे विचार शिवसैनिकांवर बिंबवले असून, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे युवा सेनेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांच्या प्रश्नासह शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याकरिता प्रयत्नशील आहेत. शिक्षणानंतर करायचे काय? हा प्रश्न आज प्रत्तेक विद्यार्थ्याच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करणारा आहे. म्हणूनच बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून जिल्ह्यातील युवा वर्गास रोजगाराची संधी देणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट आणि कोल्हापूर युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने शहरातील २१ कॉलेज मधील ११ वी ते पदवीपर्यंतच्या प्रत्येकी २०० गरजू अशा सुमारे ४२०० विध्यार्थ्यांना रु. ८४ लाखांच्या मोफत पुस्तक वितरणाचा आज केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान, कोल्हापूर” येथे कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या सुरवातीस छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्व. मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यासह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
यावेळी बोलतना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला तो राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच. एकीकडे देशात बेटी बढाओ, बेटी पढाओ सारख्या चळवळी सुरु असताना, भाजपच्या काही नेत्यांकडून महाराष्ट्रातील भगिनीबाबत काढले गेलेले अपशब्द निषेधात्मक असून, भगिनींचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो.
श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या योजनांची माहिती घेत असताना वैद्यकीय सेवेसह, शैक्षणिक उपक्रमांची माहिती मिळाली. त्यातून श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. आदेश बांदेकर यांच्याकडे सीपीआर रुग्णालयासाठी अत्याधुनिक व्हेंन्टीलेटर पुरविण्याची मागणी केली. त्यांनी तातडीने सीपीआर रुग्णालयास रु. ३३ लाखांची तीन अत्याधुनिक व्हेंन्टीलेटर सीपीआर रुग्णालयास मंजूर केली.
विद्यार्थी दशेपासून समाजकारणाचे बाळकडू वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाले. म्हणूनच विध्यार्थ्यांचे प्रश्न अगदी जिव्हाळ्याचे आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणी प्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अंगिकारताना ८० टक्के समाजकारणालाच प्राधान्य देत असून याच गोष्टी राजकारणात यशस्वी करण्यात मदत करत आहेत. विध्यार्थी सेनेचा शहरप्रमुख या पदापासून सुरवात करताना गेली १२ वर्षे विध्यार्थ्याच्या विनाडोनेशन प्रवेशासाठी दरवर्षी मोर्चा काढणारी शिवसेना हि एकमेव संघटना आहे. विध्यार्थ्याना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढण्याचे बळ हे वंदनीय शिवसेनाप्रमुखानी दिले आहे. आजच्या घडीला शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे. बालवाडी पासून मुलांना शिक्षण द्यायचे तर लाखो रुपयांची फी भरायची कोठून हा मोठा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. शिक्षणानंतर नोकरीची हमी नाही, अशा विवंचनेत अडकलेल्या युवा वर्गाला शिवसेनेचे दिलासा दिला. उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा या उपक्रमाची सुरवात झाली. पुण्यात झालेल्या पहिल्याच रोजगार मेळाव्यात सुमारे तीन हजार युवक- युवतींना नोकरी प्राप्त झाली. असाच रोजगार मेळावा पुढील महिन्यात दि. ०६ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात आयोजित करण्यात येणार असून, कोल्हापुरातील जास्तीत जास्त युवक- युवतींना नोकरी मिळवून देण्याचा आमचा उद्देश आहे.
आजचा हा पुस्तक वाटपाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गेले महिनाभर युवासेनेचे सर्वच पदाधिकारी कष्ट घेत असून, त्यांचे अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. युवासेनेच्या या उपक्रमाच्या माध्यमातून शहरामध्ये सुमारे दहा हजार युवा वर्गाने युवा सेना सदस्य नोंदणी करीत भरघोस प्रतिसाद दिला. युवा सेनेच्या माध्यमातून पुढील काळातही विध्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहास संशोधक डॉ. अमर आडके यांनी, कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला आपण उपस्थित रहात नाही, परंतु आमदार राजेश क्षीरसागर यांनी जे सामाजिक उपक्रमाचे व्रत हाती घेतले आहे त्याचा एक भाग व्हावा हा इच्छेने आपण शिवसेनेच्या या समाजउपयोगी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत असल्याचे सांगितले. विध्यार्थ्यांचे संघटन करण्याचे कौशल्य आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे असून, गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या संगणक वाटपाच्या कार्यक्रमानंतर हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. लोकाभिमुख लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यातून दिसून येते. छत्रपती शिवरायांनी संपूर्ण महाराष्ट्राला साक्षर आणि सुसंस्कृत होण्याची प्रेरणा दिली, पण काही जण आपली संस्कृती सोडून बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांना वेळीच त्याचे परिणाम भोगावे लागतील. महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील एक मुलगा आज जगातील महाशक्ती असलेल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेचा प्रमुख असून, युवा सेनेसारखे व्यासपीठ विध्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरत असल्यास निश्चितच भारत देश जगातील महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर त्यांना मिळणाऱ्या सुवर्णसंधीचे ते सोने करू शकतात, अशी खात्री आहे सांगत डॉ. अमर आडके यांनी विध्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील घटनांचा दाखला देत सामाजिक कामाप्रती मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये बोलताना महावीर कॉलेजचा विद्यार्थी शुभम पाटील याने, तरुणांचा भारत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते सत्यात उतरण्यासाठी आपल्या सारख्या युवकांनी सामाजिक कार्यात पुढे येणाची गरज आहे. शिक्षण महाग झाले असून, आजच्या ११ वी ते पदवीपर्यत सर्वच शाखांच्या पुस्तकांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ही पुस्तके खरेदी करताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. तीच पुस्तके युवा सेनेच्या माध्यमातून मोफत मिळत असून, त्याचा योग्यरीतीने वापर करून ती पुस्तके दुसऱ्या विद्यार्थ्याना वापरता येतील अशा सुस्थितीत ठेवून आपणही या सामाजिक कार्याचा भाग होऊया असे आवाहन करीत, आमदार राजेश क्षीरसागर आणि युवा सेनेचे उपस्थित विध्यार्थ्यांच्या वतीने आभार मानले.
यानंतर या उपक्रमामध्ये युवा सेना पदाधिकाऱ्यांना बहुमोल्य सहकार्य केलेल्या प्राध्यापकांचे आणि उपक्रम यशस्वी होण्यामध्ये कष्ट केलेल्या युवा सेना पदाधिकारी यांचे सत्कार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर कोल्हापूर शहरामध्ये गेल्या २ वर्षापासून पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी “वृक्षप्रेमी” हा व्हॉटसअॅप ग्रुप बजावत आहे. प्रत्येक आठवड्यात झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून निस्वार्थी भावनेने ग्रुप काम करीत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यासह आमदार मा.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सात रुग्णांना मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रु.५ लाख ७०हजार इतक्या रक्कमेच्या आर्थिक मदत पत्राचे वाटपही यावेळी करण्यात आले.
यावेळी शहाजी कॉलेजचे प्राध्यापक पांडुरंग पाटील यांनी विध्यार्थ्यांना या उपक्रमातून देण्यात आलेल्या पुस्तकांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जेष्ठ शिवसैनिक दीपक गौड, जिल्हानियोजन समिती सदस्य पद्माकर कापसे, विध्यार्थिनी प्रतिनिधी प्राजक्ता शिंदे आणि देवराज ढवळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश निपाणीकर यांनी केले.
या कार्यक्रमास माजी महापौर मारुतीराव कातवरे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, परिवहन सभापती राहुल चव्हाण, नगरसेविका सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, ऋतुराज राजेश क्षीरसागर, किशोर घाटगे, जयवंत हारुगले, रमेश खाडे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, युवासेना शहर प्रमुख अविनाश कामते, शहरप्रमुख पियुष चव्हाण, शहरप्रमुख चेतन शिंदे, ओंकार परमणे, कपिल सरनाईक, शैलेश साळोखे, प्रशांत जगदाळे, योगेश चौगुले, विश्वदीप साळोखे, गुरु लाड, ओंकार तोडकर, शिवतेज सावंत, ओंकार पाटील, आशिष गवळी, अरविंद कोळी, अभिषेक पोवार, अक्षय पाटील, प्रथमेश सावंत, अभिजित गोयानी, भैय्या राजपुरोहित, सागर गायकवाड, राज नडार, शुभम पाटील, विनायक मंडलिक, साहिल मुल्लाणी, युवराज भोसले, शुभम घोरपडे, प्रसाद बुलबुले, सुयश हांडे, नवनाथ रायकर, सागर महेंद्रकर, अभिजित पोवार, नंदिनी कांबळे, नीलम कांबळे, अवधूत घाटगे, प्रमोद वाडकर, शुभम निल्ले पाटील, कुणाल पाटील, यश जगदाळे, सौरभ कुलकर्णी, अजिंक्य पाटील, रोहिदास मांगरे, अफवान बागवान, आदर्श जाधव, शाम जाधव आदी युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply