
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव हे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार असतील. गेल्या निवडणुकीत जाधव यांना भरघोस मते मिळाली पण, विजय मिळविता आला नाही, आता मात्र २०१९ मध्ये ते विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आणि महेश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली.
तटाकडील तालीम येथे महेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून स्वाभाविकपणे महेश जाधव यांचेच नाव आले होते. या निवडणूकीत प्रचारासाठी चार-पाच दिवस जास्त मिळाले असते तर जाधव आमदारच असते. पण कधी-कधी नियतीच्याही मनात अस असतं की भविष्यात चांगला शानदार विजय मिळवून द्यावा. त्यामुळेच सर्व प्रयत्न करून चांगली मते मिळाली, पण विजय मिळाला नाही.२०१९ मध्ये या निवडणूकीची कसर भरून काढली जाईल. जाधव यांच्या वाढदिवसासाठी जेवढी गर्दी झाली आहे, त्यावरून जाधव हे २०१९ च्या निवडणूकीत कोल्हापूर उत्तरचे आमदार नक्की होतील, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांन व्यक्त केला.
महेश जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ही यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर मधील सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
भाजपचा एक खंदा कार्यकर्ता म्हणून आज महेश जाधव यांच्या कडे पाहिले जाते. तसेच अंबाबाई मंदिर हे तीर्थक्षेत्र म्हणून कसे विकसित होईल तसेच मंदिर परिसरात सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याने लोकांच्या चांगल्या भावना जाधव यांच्या सोबत आहेत.
Leave a Reply