
कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री केदारलिंग म्हणजेच जोतिबा डोंगरावर सोनी मराठी वाहिनीवरील ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. या मालिकेतील कलाकारांनी कोल्हापुरातील पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. नव्याने सुरू झालेली सोनी मराठी ही वाहिनी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या वाहिनीवरील मालिका लोकांना आवडत आहेत. त्यातीलच एक वेगळा विषय घेऊन आलेली मालिका ‘जुळता जुळता जुळता की’. बाह्यसौंदर्यापेक्षा मनात प्रेम असले तर ती नाती आयुष्यभर टिकतात. हा या मालिकेचा मुख्य गाभा आहे. यातील मुख्य अभिनेत्री दिपाली मचुरीकर हिने अपूर्वाची भूमिका साकारली आहे. मध्यप्रदेश मधील पण अस्खलित मराठीत तिने पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अपूर्वा च्या घरी तीच कुटुंब आहे पण त्यात मायेचा ओलावा नसतो. पण ती विजयच्या कुटुंबात येते तेव्हा तिला हा ओलावा जाणवतो. एकमेकांबद्दल प्रेम, त्याग करण्याची वृत्ती यामुळे ती भारावून जाते. त्याच्या कुटुंबातील नात्यांची घट्ट वीण यामुळे ती आधी विजयच्या कुटुंबाच्या प्रेमात पडते. आता पुढे काय होईल ही उत्सुकता आहे असेही दिपाली म्हणाली. पहिल्यांदाच मराठी सिरीयल करत आहे. खूप शिकायला मिळत आहे. मालिकेत विजयचं कुटुंब कोल्हापुरातील दाखवलेले आहे. कोल्हापूर खूप आवडले असेही तिने सांगितले.
मालिकेतील हिरो म्हणजेच मुख्य अभिनेता विजय म्हणजेच मदन देवधर यांच्या भोवती ही कथा फिरते. विसंगतीतून सौंदर्य निर्माण करण्याचा या मालिकेचा हेतू सफल होत आहे. यात काम करताना अनेक बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास करावा लागला. त्यात कोल्हापूरचे कुटुंब दाखवल्याने तो रांगडेपणा भूमिकेत आणावा लागला. कोल्हापूर खूप छान आहे. लहानपणापासून या क्षेत्रात काम करत आहे.माझी भूमिका असलेला न्यूड सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला.यात प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे असे मदन देवधर याने सांगितले. शूटिंग पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
Leave a Reply