गणेशोत्सवानिमित्त सागरिकाचा ‘वक्रतुंड महाकाय’ व्हिडीओ लाँच

 
“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ….”गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर आहे आणि सागरीकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या गणरायाचं स्वागत याच शब्दात केलं आहे.सागरिका म्युझिकने “वक्रतुंड महाकाय” या खास गाण्याचा व्हिडीओ गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकताच लाँच केला आहे. या व्हिडिओच दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे. मराठी संगीत क्षेत्रातील दोन आघाडीच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे या दोघांच्या दमदार आवाजात हे गीत संगीतबद्ध करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये काहे दिया परदेस फेम ऋषी सक्सेना आणि घाडगे आणि सून मधील रिचा अग्निहोत्री आणि नवोदित कलाकार निरंजन जोशी यांनी आपली उत्तम अदाकारी दाखवली आहे
लगबग चालली, सारखं गोड अविट चालीचं सुपरहिट गीत देणाऱ्या सुहित अभ्यंकर ने हे गीत संगीतबद्ध केलं आहे. पारंपरिक ढोल, ताशा,  तुतारी या वाद्यांसोबत गिटार चा सुंदर मिलाफ या गाण्यात आहे. नचिकेत जोग यांनी गाण्याचे साधेसोपे, अर्थपूर्ण आणि आजच्या परिस्थितीला साजेशे असे शब्द लिहिले आहेत.
सागरिका म्युझिकच्या ऑफिशिअल युट्युब चॅनेलवर आपल्याला हा व्हिडीओ पाहता येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!