
हाइक या भारतातील पहिल्या स्वदेशी मेसेजिंग अॅपने आज गणेश चतुर्थीकरिता नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅक्सची घोषणा केली आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीमधील नवीन स्टिकर पॅक्स गणेशोत्सवाचे नवीन पैलू आणि या सणाशी जोडलेल्या साजरीकरणाला दर्शवतात.
या स्पेशल पॅक्समध्ये गणेशोत्सवाचा सोहळा आणि विसर्जनासह लोकप्रिय संकल्पना दाखवण्यात आल्या आहेत. यात मुंबई, पुण्यातील प्रसिद्ध मंडप आणि पुण्यातील अष्टविनायकही आहेत. नवीन कॅमेरा स्टिकर्सचा वापर सणांकरिता शुभेच्छांसह फोटोंना जोडण्याकरिता करता येईल.
उत्सवाच्या काळात १२ सप्टेंबरपासून हे स्टीकर अॅपमध्ये उपलब्ध आहेत. हाइक वापरकर्ते १० दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान आपल्या मित्रमंडळी व नातेवाईकांना मजेशीर, रंगपूर्ण व पारंपारिक शैलीत शुभेच्छा देण्याकरिता या स्टिकर्सना डाऊनलोड करू शकतात.
Leave a Reply