
कोल्हापूर: गेली पाच वर्षे विविध सामाजिक उपक्रमातून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा रंकाळा वेस गोल्ड सर्कल मित्रमंडळाने जोपासली आहे. यावर्षीही ही परंपरा पुढे चालवीत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबिर, दंतचिकित्सा, स्वाइन फ्लू व डेंगू प्रतिबंधक लस, रक्तातील साखर तपासणी, रक्तगट तपासणी, ऍनिमिया तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, नेत्ररोग तपासणी तसेच मोफत ईसीजी व उपचार करण्यात येणार आहेत. अशी माहिती अध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकारांना दिली.
1978 साली या मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यावेळेपासून विविध सामाजिक देखावे या मंडळाने दाखविले. पण गेली पाच वर्षे मुंबईच्या लालबागच्या राजाची प्रतिकृती कोल्हापूरचा राजा म्हणून प्रतिष्ठापना केली जात आहे. तसेच पारंपारिक व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा अविरतपणे जपत आहे. गेली पाच वर्षे सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबविले. याचा लाखो भाविकांनी लाभ घेतला. तसेच यावर्षीदेखील असेच सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये वैद्यकीय तपासणीसह केरळ पूरग्रस्तांना मदत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यांचाही समावेश असणार आहे. उद्या सायंकाळी सात वाजता दर्शन मंडप उद्घाटन व आरती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापौर शोभाताई बोंद्रे, जिल्ह्यातील आमदार खासदार या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. असे उपाध्यक्ष अभिजीत टांकसाळकर यांनी सांगितले. शिस्तबद्ध मिरवणूक कोल्हापूरच्या राजाची यथासांग पूजा हे या मंडळाने वैशिष्ट्य जपलेले आहे असेही ते म्हणाले.पत्रकार परिषदेस खजनिस कुणाल पाटील यांच्यासह पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply