
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्साह पाहता याजिल्ह्यात युवासेनेची चांगली बांधणी करून युवासेनेचा ग्रामीण व शहरी भागात विस्तार करून युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीतून युवकांचे, विध्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. युवा सेनेची संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने युवासेनेच्या विविध पदांकरिता आज “सर्किट हाउस (शासकीय विश्रामगृह), कोल्हापूर” येथे मुलाखतीना सुरवात झाली. याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी मुलाखत घेण्यास आलेल्या युवा सेना वरिष्ठ पदाधिकारी यांचे सत्कार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते केले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी” “शिवसेना जिंदाबाद, युवसेना जिंदाबाद” “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे” यांच्या विजयाच्या घोषणानी शासकीय विश्रामगृह परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या दहा पैकी सहा आमदार शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ वाढवून शिवसेनेचा एकहाती भगवा विधानसभेवर फडकाविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब आणि युवासेना अध्यक्ष मा. आदित्याजी ठाकरे यांच्या आदेशाने समस्त शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. त्यांच्या कार्यास बळकटी देण्याकरिता आणि संघटना बांधणीच्या दृष्टीने युवासेनेच्या विविध पदांकरिता कोल्हापुरात विधानसभा मतदार संघ निहाय मुलाखती पार पडणार आहेत. कोल्हापूर शहरातील युवासेनेचे काम वाखाणण्याजोगे आहे. गेल्या दोन आठवड्यापूर्वी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट च्या माध्यमातून सुमारे ४२०० विध्यार्थ्याना मोफत पुस्तक वाटप उपक्रम युवा सेनेच्यावतीने यशस्वीरीत्या राबविण्यात आला आहे. यासह दरवर्षी डोनेशन विरोधी मोर्चा काढून अन्यायकारक डोनेशनवर चाप बसवून पालकांसह विद्यार्थ्यांची होणारी लुबाडणूक थांबविली जाते. यासह शिवाजी विद्यापीठातील विध्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यास युवासेना नेहमीच अग्रभागी राहिली आहे. सामाजिक कामात रक्तदान शिबीर, फळे वाटप, वृक्षारोपण, आदी कार्यक्रम राबवून युवा सेनेने शहरवासीयांच्या मनात वेगळा ठसा उमठविला आहे. तसेच फुटबॉल, क्रिकेट, लाठी- काठी आदी खेळांची सांगड घालत युवासेना खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे पुढील काळात युवा सेनेच्या संघटनात्मक बांधणीतून युवकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित युवा सैनिकांना केले.
यावेळी शिवसेना सचिव श्री. सुरज चव्हाण, युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य श्री. पवन जाधव, कोल्हापूर जिल्हा युवसेना संपर्कप्रमुख श्री. ऋषिकेश गुजर, युवा सेना महाराष्ट्र कार्यकारी सदस्य श्री. हर्षल सुर्वे आदींनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अंकुश निपाणीकर यांनी केले.
आजच्या दिवसामध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ, करवीर विधानसभा मतदार संघाकरिता मुलाखती पार पडल्या असून उद्या शनिवार दि. २९ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता चंदगड विधानसभा मतदार संघ, राधानगरी विधानसभा मतदारसंघ, कागल विधानसभा मतदारसंघाक्रिता मुलाखती पार पडणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र युवा सेना सरचिटणीस श्री. अमोल किर्तीकर, शिवसेनेचे मुंबई महापालिका नगरसेवक व युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य श्री. अमेय घोले, युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य श्री. पवन जाधव, युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य श्री. रुपेश कदम, कोल्हापूर जिल्हा युवसेना संपर्कप्रमुख श्री. ऋषिकेश गुजर, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या कु. शीतल देवरुखकर, निखील जाधव,सह सचिव कु.रेणुका विचारे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, युवा सेनेचे हर्षल सुर्वे, ऋतुराज राजेश क्षीरसागर, युवा सेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, चेतन शिंदे, अविनाश कामते आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply