हिरा म्हणतेय “स्टंट” करतांना दुखापत झाली पण आत्मविश्वास वाढला!

 
बाजी या मालिकेच्या कथानकात लोहा हिराला ओलीस ठेवून स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असतो.तेव्हा तो हिराच्या गळ्याला विळी लावून तिला जेरबंद करतो आणि दरवाज्याकडे घेऊन जाण्यास सांगतो.या झटापटीत हिराला गळ्याला दुखापत झाली.भोर येथील वाडयात या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. तातडीने तिच्यावर उपचारही झाले.
या घटनेविषयी हिराची भूमिका करणारी नुपूर दैठणकर म्हणते की मुळात हिरा तलवार चालवते,दांडपट्टा चालवते. ही भूमिका एका धाडसी मुलीची आहे.त्यामुळे घोडेस्वारी पासून ते पहिल्या मजल्यावरून खाली उतरण्या पर्यंत सगळे स्टंटस मी केले.या शॉट च्या वेळेसही हातातली विळीअजिबात धारदार नव्हती,वरून आमच्या फाईटच्या टीम नं त्याला ट्रांस्परंट प्लास्टिकही चिटकवला होतं.पण तरीही  झटापटीत ही दुखापत झाली.पण आमचे दिग्दर्शक संतोष कोल्हे सर आणि  माझी सगळी टीम क्षणात धावून आली.लगेच प्राथमिक उपचार झाले.आणि उलट या यानंतर माझा स्टंट करतानाचा आत्मविश्वास दुपटीने वाढला”
लोहा चा मृत्यू हा बाजींच्या कथानकातला एक महत्वाचा टप्पा आहे.असेही नुपूर दैठणकर हिने सांगितले.या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं असून झी मराठीवर ही मलिका सोमवार ते शनिवार रोज रात्री साडेदहा वाजता प्रसारीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!