
टेक्नॉंलॉजी :तुम्हाला जर सांगितलं की बिल गेट्सच्या तीन मुलांचं आयुष्य कसं असेल याची कल्पन करा तर तुम्ही काय कल्पना कराल की, त्यांच्या घरात सर्वांत प्रगत इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतील. त्यामुलांना नव्या टेक्नॉलॉजी आधारित खेळ आणि फोन भरपूर वापरता येत असतील. तुम्ही चुकत आहात,धक्का बसला ना?टेक्नॉलॉजीतील दिग्गज आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या मुलांच्याटेक्नॉलॉजी वापरावर अनेक बंधनं घातली आहेत.आश्चर्य वाटलं ना पण हे सत्य आहे. मुलं १४वर्षांची होईपर्यंत मुलांना फोन द्यायचा नाही असंबिल आणि मेलिंडा यांनी ठरवलं आहे.
झोपण्यापूर्वीथोडावेळ टीव्ही पहायचा आणि रात्रीच्याजेवणाच्या टेबलवर फोन आणायचा नाही असाहीदंडक आहे.२० वर्षांची जेनिफर, १७ वर्षांचा रोरी आणि १४वर्षांची फोएब यांचे वडिल बिल याला दुजोरादेतात. ते म्हणतात, आम्ही जेव्हा जेवायला बसतोतेव्हा आम्ही जेवणाच्या टेबलावर फोन आणतनाही. आम्ही आमची मुलं १४ वर्षांची होईपर्यंतआम्ही त्यांना सेलफोन दिले नाहीत आणि त्यांचीतक्रार असते की त्यांच्या इतर मित्रांना सेलफोनत्यांच्या आधी मिळाले. आम्ही टीव्ही पाहण्याचीहीवेळ निश्चित केली आहे त्यानंतर कोणीही टीव्हीपाहत नाही त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळते.
आजच्या डिजिटल युगात झालेल्या तंत्रज्ञानक्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावाणाऱ्या बिलगेट्सनाही असंच वाटतं की लहान मुलांच्याइलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापराला मर्यादा असल्याचपाहिजेत हे एक विडंबनच म्हणायला हवं. तुम्ही घरचा अभ्यास, मित्रांशी संपर्कातराहण्यासाठी स्मार्टफोन, सोशल मीडियाचा वापरकरता हे उपयोगी आहेच पण त्याचा अतिरेकहोतो,असं ते म्हणतात.आश्चर्यकारक हे आहे की गेट हे आयटीतील एकमेवदिग्गज नाहीएत ज्यांनी मुलांच्या तंत्रज्ञानवापरावर बंधनं घातली आहेत. जगविख्यातसंशोधक आणि ॲपल कंपनीचा संस्थापक स्टीव्हजॉब्जने २०१४ मध्ये न्यूयॉर्क टाइम्सच्यावार्ताहराला सांगितलं होतं की त्याच्या मुलांनीअजून आयपॅड वापरलेला नाही. त्याचबरोबर आमच्या मुलांनी घरामध्ये तंत्रज्ञानाचा किती वापरकरावा यावर आम्ही बंधने आणली आहेत, असेही त्याने सांगितले होते.स्टीव्ह जॉब्जचे चरित्र लिहिणाऱ्या वॉल्टरइस्कॉननेही जॉब्ज कुटुंबीयांच्या रात्रीच्या जेवणाबाबत लिहिताना याला दुजोरा दिला आहे.
त्यांच्या स्वयंपाकघरातील मोठ्या टेबलवर सगळ्यांनी जेवायला एकत्र बसायचं आणि त्यावेळीनिरनिराळी पुस्तकं, इतिहास आणि इतर विविधविषयांवर चर्चा करायची अशी स्टीव्हची पद्धतहोती, असेही त्याने पुस्तकात नमूद केले आहे. माझ्या मुलांपैकी एकानेही आयपॅड किंवाकॉम्प्युटर मागितलेला नाही. मुलांना उपकरणांचंअजिबात व्यसन लागलेलं नाही.वायर्डचे माजी संपादक ख्रिस अँडरसन यांनी घरातइलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर कडक प्रतिबंधघातला आहे. ते म्हणतात, कारण तंत्रज्ञानाच्याअतिरेकाचे दुष्परिणाम काय होतात हे आम्हीजवळून पाहिले आहे. त्यांच्या पाच मुलांनाबेडरूममध्ये टीव्ही लावायला परवानगी नाही.ब्लॉगर,ट्विटर आणि मीडियमचा संशोधक इव्हानविल्यम्सने आपल्या दोन मुलांना शेकडो पुस्तकंविकत आणून दिली पण आयपॅड द्यायला नकारदिला. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसारजगातील सर्वांत महान तंत्रज्ञ आपल्या मुलांच्यातंत्रज्ञान वापरावर निर्बंध घालत आहेत. तुमच्याकुटुंबाचं काय? तुमच्या कुटुंबात टीव्ही पाहण्यावर तुम्ही काही बंधने घातली आहेत का?
Leave a Reply