श्री लक्षमीपती व्यंकटेश्वरा ट्रस्ट च्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

 

कोल्हापूर: शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे करवीर नगरीचा लोकोत्सव उत्साहाने साजरा करण्यासाठी देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने कोल्हापुरात येत असतात. अंबाबाई मंदिरातील भव्य दिव्य सोहळा जवळून पहायला मिळावा क्षणभर जगदंबा मातेचे दर्शन व्हावं असं सर्वांना वाटत असते. याकरिता श्री लक्ष्मीपती व्यंकटेश्वरा देवस्थान ट्रस्ट व कोल्हापूर मधील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांच्या वतीने जयप्रभा स्टुडिओ समोर असलेल्या भक्ती पूजा नगर परिसरात सर्वसामान्य भाविकांना सहभाग घेता येण्याकरिता नवचंडी होम, श्री महालक्ष्मी मातेच्या मूर्तीची विधिवत स्थापना, अभिषेक मूर्तीपूजन, दर्शन भक्ति नित्य पूजा, धार्मिक कार्यक्रम, यज्ञ व प्रसादाचे आयोजन ११ अक्टोबर ते १८ऑते १८ ऑक्टोबर दरम्यान सकाळी साडे सात ते साडे अकरा व सायंकाळी सहा ते साडे नऊ या वेळेत करण्यात आले आहे, अशी माहिती पारस ओसवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांच्या समाजकार्यात आई अंबाबाईचा आशीर्वाद लाभावा व करवीर जनतेच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी आणि देवीवरील श्रद्धा वृद्धिंगत करण्यासाठी भाविकांनी याचा लाभ घ्यावा या भावनेने हा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम करणारी भजनी मंडळे, मंत्रोच्चार दुर्गा सप्तशती पठण, पूजन करणारे साधक व कलाकार मंडळींनी स्वयंस्फूर्तीने येथे येऊन आपली कला सादर करावी असे आवाहनही संयोजकांनी केले आहे. या विधिवत पौरोहित्य कार्यक्रमासाठी वेदशास्त्रसंपन्न रघुनाथ जोशी शास्त्रीबुवा, अमृत गुळवणी गुरुजी उमाकांत राणींगा गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत चंदन मिरजकर, महेश कामत, मनिष झवर किरण नकाते, अतुल भंडारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!