शारदीय नवरात्रउत्सवनिमित्ताने महिलांसाठी मोफत नवदुर्गा दर्शन सहल

 

कोल्हापूर: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून अडवाटेवरच कोल्हापूर, श्रावण मास यात्रा नंतर शारदीय नवरात्रउत्सवा निमित्ताने महिलांसाठी मोफत नवदुर्गा दर्शन सहल आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती राहुल चिकोडे आणि प्रमोद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी कल्पक व यशस्वी प्रकल्पांचे आयोजन करण्याऱ्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अश्या प्रकारची भक्ती सहल आयोजित केली आहे. संवेदना फाउंडेशन, हिल रायडर्स फाउंडेशन यांच्या सहकार्यातून महिलांच्या अध्यात्मिक आनंदासाठी ११ ते १७ आक्टॉम्बर दरम्यान सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत कोल्हापूर मधील नवदुर्गा दर्शन यात्रेचा लाभ महिलांना घेता येणार आहे . तसेच लोकसहभागातून देवराई चे रक्षण, पुनर्निर्माण व वृक्षारोपण करण्याचाही मानस आहे असे निसर्ग मित्र व अभ्यासक अनिल चौगले यांनी सांगितले. यासारखे प्रकल्प यशस्वीपणे पार पडण्यासाठी हिल रायडर्स फाउंडेशनच्या वतीने नवीन बस घेण्यात आली असून याचा लोकार्पण सोहळा ११ तारखेला सकाळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता प्रायव्हेट हायस्कूल येथे करण्यात येणार आहे.या यात्रेत महिलांना नाश्ता ची सोय करण्यात आली आहे. तरी या यात्रेसाठी समिट अडव्हेंचर्स ,न्यु शाहूपुरी येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!