कोल्हापूर : गायन समाज देवल क्लबतर्फ पं आनंदाराव लिमयेबुवा यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आनंद -पर्व जयपूर घराणे स्वरचिंतन या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे . हा कार्यक्रम १७ आणि १८ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता राम गणेश गडकरी सभागृहात होणार असल्याची माहिती श्रीकांत डिग्रजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली .
या कार्यकमात जयपूर घराण्याच्या राग आणि बंदिशींवर चर्चासत्र होणार आहे . दोन दिवसीय चर्चासत्रात एकूण चार सत्रे असणार आहेत . या सत्रातून जयपूर घराण्याच्या उपशाखांमध्ये प्रचलित असलेली विविध रुपे यांचा आढावा चर्चेद्वारे घेण्यात येणार आहे . तसेच आनंद पर्व स्मरणिकेचे प्रकाशनही या वेळी होणार आहे .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुक्रमे सुधीर पोटे, श्रुति सडोलीकर, मिलिंद मालशे आणि अश्विनी भिडे करणार आहेत. दि . १७ ला सुखदा काणे, भारती वैशंपायन, अरुण कुलकण, विश्वास शिरगावकर, मृत्युंजय आगडी, उल्हास कशाळकर, दिनकर पणशीकर, प्रतिमा टिळक, रघुनंदन पणशीकर, शौनक अभिषेकी, भालचंद्र टिळक आदी ज्येष्ठ सहभागी होत आहेत . तर दि . १८ ला अरुण द्रविड, रुतुजा लाड, लता गोडसे, देवकी पंडीत, सुलभ पिशवीकर, विनोद दिग्रजकर, अलका देव, मंजिरी कर्वे, मधुवंती देव सहभागी होणार आहेत .
कार्यक्रमासाठी दि १३ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे .नोंदणीसाठी शुभेंद्र मोर्डेकर , श्रीकांत पित्रे यांच्याशी संपर्क साधावा.तसेच स्व. गोविंदराव टेंबे यांनी लिहिलेल्या अल्लादियां खां साहेबांच्या चरित्र पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे . जयपूर घराण्याची परंपरा आणि खां साहेबांच्या शिष्यांची ओळख या निमित्ताने होणार आहे . ३० वर्षानंतर या दुर्मिळ पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. पत्रकार परिषदेला सुधीर पोटे, ज्ञानेश चिरमुले, शुभेंद्र मोर्डश्वर उपस्थित होते.

Leave a Reply