
कोल्हापूर: सर्व्हिस ऑन व्हील्स आणि ब्रँड टूरचा खास अनुभव दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गांतील मर्सिडीझ बेन्झच्या चाहत्यांसाठी पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून सर्व्हिस ऑन व्हील्स पुढील सात महिन्यांच्या कालावधीत भारतातील दक्षिण आणि पश्चिम भागांमधील ३० शहरांमध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. खास मर्सिडीझ बेन्झ ब्रँड टूर अनुभव वारंगल, तिरूनलवेली, कन्नूर, हुबळी आणि दक्षिण गोवा येथे घेता येईल.सर्व्हिस ऑन व्हील्सची प्रमुख वैशिष्टे म्हणजे सर्व्हिस ऑन व्हील्स ट्रक आवश्यक असलेले सर्व भाग, साधने आणि उपकऱणे जसे मोबाइल लिफ्टिंग प्लॅटफॉर्म, स्टँडर्ड आणि स्पेशल टूल्स, जनरेटर, डायग्नोस्टिक उपकरणे, डिजिटल सर्व्हिस ड्राइव्ह आणि तपासणी, दुरूस्ती व गाड्यांची सर्व्हिस यांच्यासाठी आणखी साधने ज्यामुळे ग्राहकांना आपल्या दारात जास्त मूल्य आणि सोय मिळेल. चाहत्यांना आपल्या आवडीची मर्सिडीझ बेन्झची टेस्ट ड्राइव्ह घेता येईल आणि या ब्रँडचा अनुभव खूप जवळून वैयक्तिकरित्या घेता येईल. मोफत वाहन मूल्यमापन, स्पेशल ट्रेड इनच्या संधी, सर्व्हिस ऑफर्स आणि पॅकेजेस, वैयक्तिक वित्तपुरवठ्याच्या ऑफर्स आणि इतर मूल्यवर्धित सेवा मर्सिडीझ बेन्झच्या सेल्स, डीएफएसआय आणि प्रमाणित टीम्सकडून दिल्या जातील
भारतातील सर्वांत मोठ्या लक्झरी कार उत्पादक असलेल्या मर्सिडीझ बेन्झने आज आपल्या खास ग्राहक सेवा ऑफरिंग सर्व्हिस ऑन व्हील्सच्या उद्घाटनाची घोषणा आपल्या मर्सिडीझ बेन्झ ब्रँड टूर या खास कार्यक्रमासोबत कोल्हापूरमध्ये केली आहे. या दोन्ही ग्राहक केंद्री उपक्रमांचे प्रमुख लक्ष दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गातील शहरांमधील मर्सिडीझ बेन्झच्या चाहत्यांच्या जवळ जाण्याचे आहे. अद्ययावत सर्व्हिस ऑन व्हील्स ट्रक ग्राहकांना दारोदारी जाऊन सेवा देईल आणि खास ब्रँड अनुभव देणारी ब्रँड टूर आपल्या संभाव्य ग्राहकांना एका शोरूमचा अनुभव देईल आणि त्यांना जागतिक ख्यातीचा थ्री पॉइंटेड स्टार अनुभव घेता येईल. यावेळी प्रथमच मर्सिडीझ बेन्झचा एक एंड-टू-एंड उत्पादन ते सेवा अनुभव त्यांच्या चाहत्यांना एकाच छताखाली घेता येईल.
श्री. मायकेल जोप, उपाध्यक्ष – मार्केटिंग आणि विक्री, मर्सिडीझ बेन्झ म्हणाले की, ”मर्सिडीझ बेन्झ ही आपल्या ग्राहक केंद्री अनुभवासाठी ओळखली जाते आणि ब्रँड टूर ही एक अशी संकल्पना आहे, जी आपल्याला टायर २ आणि टायर ३ या उगवत्या बाजारपेठांमध्ये आपला पाया रोवण्यास मदत करते. ब्रँड टूरसोबत आम्ही छोट्या शहरांतील बाजाराच्या क्षमता ओळखण्याचे आणि ग्राहकांना खास व ख्यातनाम मर्सिडीझ बेन्झ अननुभव देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत आहोत. कोल्हापूर ही मर्सिडीझ बेन्झसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे की, हा उपक्रम या ब्रँडला आपला पाया भारतीय बाजारपेठेत आणखी खोलवर रूजवण्यासाठी फायदेशीर ठरेल. आम्हाला आशा आहे की, आमच्या कोल्हापूरमधील ग्राहकाना या ब्रँडचा अनुभव खूप आनंददायी ठरेल.”
श्री. संतोष अय्यर, उपाध्यक्ष – ग्राहक सेवा आणि कॉर्पोरेट अफेयर्स, मर्सिडीझ बेन्झ इंडिया म्हणाले की, ”भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गातील शहरे मोठ्या बाजारपेठा म्हणून उदयास येत आहेत आणि ती वाढीला चालना देतील, असे अपेक्षित आहे. या पहिल्या-वहिल्या सर्व्हिस ऑन व्हील्सचे उद्दिष्ट आमची लहान शहरांतील ग्राहकांप्रति वचनबद्धता वाढवण्याचे आहे. हा उपक्रम आमच्या ‘गो टू कस्टमर’ तत्वज्ञानाचा भाग आहे- आम्ही कायमच आमच्या ग्राहकांच्या हितासाठी काम केले आहे आणि त्यावर कार्यरत आहोत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण आणि पश्चिम भारतातील दुसऱ्या व तिसऱ्या वर्गातील बाजारपेठांमध्ये जाईल आणि त्यात कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूर, कोइम्बतूर, कोचीन इत्यादी शहरांचा समावेश आहे. आमचे ग्राहक मोठ्या प्रमाणावरील भारतीय क्षेत्रांमधील आहेत आणि आम्हाला आशा आहे की, हा उपक्रम त्यांना कार खरेदीच्या बाबतीत एक आनंददायी अनुभव देईल. आमच्या देशभरातील वचनबद्ध डीलर भागीदारांच्या मदतीने आम्हाला हा उपक्रम भारतातील विविध बाजारपेठांमध्ये जाईल, असा विश्वास वाटतो. या उपक्रमाद्वारे आम्ही ग्राहक सेवा आणि समाधानाप्रति आमची वचनबद्धता नव्याने स्पष्ट करून लक्झरी कार उदयोगात एक नवीन टप्पा तयार करत आहोत.”’सर्व्हिस ऑन व्हील्स’ हे ग्राहकांसाठी अत्यंत सहजसाध्य मोबाइल सर्व्हिस सेंटर असून येथे सर्व्हिस ट्रकमधील मर्सिडीझ बेन्झची टीम मोबाइल लिफ्टिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून कारची तपासणी करते. या डोअरस्टेप सेवेसोबत अद्ययावत सेवा ट्रक असून त्यात मर्सिडीझ बेन्झच्या डिजिटिल सर्व्हिस ड्राइव्ह क्षमता आहेत. सर्व्हिस ऑन व्हील्स मोबाइल ट्रक विविध शहरांमध्ये जाईल आणि ग्राहकांच्या विभागांना भेट देऊन तपासणी, दुरूस्ती व गाडीची सर्व्हिसिंग करेल आणि ग्राहकांना उत्तम मूल्य व सोय देईल. विशेष प्रशिक्षित ग्राहक सेवा सल्लागार, व्हीपीसी (वाहन तयारी केंद्रे) तंत्रज्ञ, विक्री सल्लागार आणि इतर सहाय्यक कर्मचारी प्रत्येक भेट देण्याच्या ठिकाणी मर्सिडीझ बेन्झ सर्व्हिस ऑन ट्रकसोबत जातील.मर्सिडीझ बेन्झ ब्रँड टूर’ आपल्याकडे मर्सिडीझ बेन्झ असावी, असे स्वप्न बाळगणाऱ्या परंतु आपल्या शहरात शोरूम उपलब्ध नसल्यामुळे ब्रँडचा अनुभव घेण्याची संधी न मिळालेल्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या ब्रँड टूरचे उद्दिष्ट ग्राहकांसोबत सहभागी होण्याचे आणि त्यांना उत्तम दर्जाचा ब्रँड अनुभव जसे टेस्ट ड्राइव्ह, ऑफ रोडिंग देण्याचे आणि संपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ दाखवण्याचे आणि त्याचबरोबर मर्सिडीझ बेन्झ प्रमाणित, ग्राहक सेवा आणि लवचिक वित्तीय सेवा देण्याचे आहे.
Leave a Reply