
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने केएम एकॉन चे शानदार उद्घाटन
कोल्हापूर : भारतात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. याचे विघटन व्हायचे नसेल तर धोकादायक शक्तींपासून नेहमी सावध राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील पद्मश्री ऍड. उज्वल निकम यांनी केले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (शाखा आयएमए) यांच्यावतीने आयोजित केएमकॉन 2018- 19 या वैद्यकीय शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पक्षकाराला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही केस चालवता येत नाही तसेच रुग्ण व नातेवाईक यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. यासाठी रुग्ण व डॉक्टर यांच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे अशी अपेक्षा ऍड. उज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केली. तपास यंत्रणेमध्ये डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यांच्या निदानावरच काही गोष्टींचे निकष ठरवले जातात. असे सांगत ऍड. निकम यांनी आपल्या कारकिर्दीतील विशेष केस बद्दल काही गोष्टी विशद केल्या. अजमल कसाबच्या केसकडे मी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. फाशी देण्यापेक्षा पाकिस्तानचा यात हात आहे हे सिद्ध करणे महत्त्वाचे होते असेही ते म्हणाले. स्वतःचा आत्मविश्वास व दुसऱ्याला ओळखण्याची क्षमता, अभ्यास,तर्क शक्ती आणि प्रसंगावधान यांच्या आधारावरच आपण गोष्टी साध्य करू शकतो. सिनेअभिनेत्यांवर केस सुरु असते त्या वेळेला जनता व प्रसार माध्यम यांचे जास्तच लक्ष वकिलांकडे असते. जितकी जास्त प्रसिद्ध व्यक्ती तेवढे तिच्यावर एखादा खटला सुरू असेल तर ती प्रकाश झोतात असते. सिरीयल व सिनेमा यांच्यामध्ये किती गुरफटायचं हा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यानंतर प्रसिद्ध मेंदू तज्ञ डॉ. थिमाप्पा हेगडे यांनी मार्गदर्शन केले.कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी असोसिएशनच्या उपक्रमाबद्दल व भविष्यातील वाटचालीबद्दल माहिती दिली. सचिव डॉ. आबासाहेब शिर्के यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भरत कोटकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. तसेच डॉ. संतोष प्रभू यांनी या शिखर परिषदेमागील हेतू विशद केला. यावेळी केएमए फ्लॅश अंकाचे प्रकाशन व वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.डॉ. अमर अडके यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी डॉ. किरण दोषी,डॉ. रवींद्र शिंदे,डॉ. राजेंद्र वायचळ,डॉ. आनंद कामत, डॉ.अमोल कोडोलीकर, डॉ. पी. एम. चौगुले, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. शैलेश कोरे,डॉ.आशा जाधव,डॉ. देवेंद्र होशिंग, डॉ. सोपान चौगुले, डॉ. लतिका पाटील,डॉ. अरुण धुमाळे, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. शितल देसाई, डॉ. नवीन घोटणे,डॉ. रमाकांत दगडे,डॉ. सूर्यकांत मस्कर,डॉ. अजीत लोकरे उपस्थित होते.
Leave a Reply