
मोटू पतलू या लहान मुलांच्या अतिशय आवडीच्या पात्रांनी चंद्रावर , पाण्याखाली आणि कुंगफू लँडवर आपली छाप सोडल्यानंतर आता आनंद,विनोद आणि साहस पुन्हा सुरू करण्याची तयारी केली आहे. देशभरांतील लोकप्रिय अशी ही जोडी आता दोस्ती, बेजोड धैर्य, साहस व विनोदाची बहार आणणार आहेत. सर्वांत चांगले असे हे दोस्त आता या सणासूदीच्या दिवसात नवीन साहस आणत असून त्यांच्या नवीन अशा ‘मोटू पतलू कुंगफू किंग्ज ४: दि चॅलेंज ऑफ कुंग फू ब्रदर्स ’ मध्ये दुष्टांशी लढा देणार आहेत. नवीन साहस आणि विनोदाने भरलेला हा चित्रपट असून त्याचा विशेष प्रिमियर रविवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता केवळ निकलोडियन वर पहायला मिळणार आहे.
मोटू पतलू कुंग फू किंग्ज ४ : दि चॅलेंज ऑफ कुंग फू ब्रदर्स मध्ये मोटू पतलू आपला प्रवास आता टोक्यो शहराच्या वेशीवर असलेल्या शहराकडे करणार असून त्यांत अतिशय दुष्ट अशी दोन भावांची जोडी कुंग फू ब्रदर्स कुंग आणि फू यांच्याशी लढणार आहे. कारण या दोन्ही भावांना आपल्या मार्शल आर्टसचा गैरवापर करून जगावर राज्य करायचे आहे. ते मोटू पतलू ला कुंगफू लढाईसाठी आव्हान देतात. मग मोट पतलू हे आव्हान स्विकारतात का आणि कुंग फू बंधूंपासून या जगाला वाचवतात का? अतिशय विनोदी असा हा चित्रपट असून या साहसातील हे उत्तर मिळवण्यासाठी केवळ निकलोडियन वर पहायाला विसरू नका.
तर मग आता विनोदा वर स्वाधीन होऊन मनोरंजन आणि ॲक्शन सह आता मोटू पतलू आणि त्यांचे मनोरंजक साहस पहायला विसरू नका.
Leave a Reply