कोल्हापुरात पुन्हा माणुसकीच्या भिंत २ व ३ नोव्हेंबरला सीपीआर चौकात आयोजन

 

कोल्हापूर : सलग तिसऱ्या वर्षी यंदाच्या दिपावलीच्या पुर्वसंध्येला ‘नको असले ते द्या, हवे ते घेवून जा’ हे ब्रिद वाक्य घेवून पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहत आहे. कोल्हापूकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली जूनी परंतू वापरायोग्य कपडे गरजूंना मिळावित या उद्देशाने उभारण्यात आलेली माणूसकीची भिंत सीपीआर चौकात उभी राहत आहे. २ व ३ नोव्हेंबरला दोन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी आठवाजेपर्यंत वापरण्यायोग्य जुनी-नवी कपडे दान करावीत तसेच गरजूंनी त्याचवेळी घेवनू जावीत, असे आवाहन संयोजकांच्यावतीने आमदार सतेज पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केले.
उपक्रमाची माहिती देताना आ. पाटील म्हणाले, नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा, हे ब्रीद घेऊन माणुसकीची भिंत हा उपक्रम तीन वर्षापासून राबवित आहे. उपक्रमाला दातृत्ववान कोल्हापूरकरांनी मोठा उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. त्यामुळे वापरता येतील असे तीन लाखांहून अधिक कपडे गरजू लोकांपर्यंत पोहाचवता आले. कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचे अनुकरण करीत कोल्हापुरात इतर ठिकाणी, इचलकरंजी, पुणे, मुंबई, बिहार, छत्तीसगड यासह अन्य ठिकाणी माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या. यंदाच्या वर्षी कोल्हापूरकर वापरण्यायोग्य नवे-जुने कपडे माणुसकीच्या भिंतीवर देवून गरीबांची दिवाळी आनंदी करण्यासाठी मदतीचा द्यावा.
मुस्लिम बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, या उपक्रमासाठी कपडे देताना ते स्वच्छ धुवून, इस्त्री करुन आणि पुरूष, मुले आणि महिला अशी वर्गवारी करुन दिल्यास ते गरीब गरजूंना अधिक चांगल्या पद्धतीने देता येतील. या उपक्रमाच्या संयोजनासाठी विश्वास पाटील, संतोष पाटील, सुखदेव गिरी, सचिन पाटील, प्रशांत पोकळे, प्रसाद पाटील, अमर पाटील, सुरज पाटील, निनाद कामत, इम्तियाज मोमीन, डॉ. देवेंद्र रासकर आदी परिश्रम घेत आहेत.
व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरील चर्चेतून साकारला उपक्रम
व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरील चर्चेतून माणुसकीची भिंत उपक्रमाची सुरुवात झाली. त्याला आमदार सतेज पाटील यांचे पाठबळ लाभले. पहिल्या वर्षी तीन दिवसाच्या उपक्रमात २५६९ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घरातील जुनी मात्र, वापरण्यायोग्य १ लाख ७९ हजार ८३० कपडे या उपक्रमासाठी जमा केली होती. मागील वर्षी तीन हजार लोकांनी दोन लाखांहून अधिक कपडे दिली. ती गरजूंना वाटप करण्यासह उसतोड कामगारांना पोहत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!