‘रणांगण’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर

 

सचिन पिळगावकर आणि स्वप्निल जोशी या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाने नटलेला ‘रणांगण’ हा सिनेमा पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. स्वप्नील जोशीचं आजवर न पाहिलेलं रुप या सिनेमातून पाहता येईल. या सिनेमात जे रणांगण आहे ते नात्यांमधील द्वंद्वाचं आहे, त्यामुळे ते सर्वार्थाने वेगळं ठरणार आहे. आजवर चॉकलेट हिरोच्या भूमिकांमधून झळकलेला अभिनेता स्वप्निल जोशी प्रथमच रणांगण या सिनेमातून खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. खास बात म्हणजे या सिनेमातील सचिन पिळगावकर आणि स्वप्निल जोशी यांची परस्परविरोधी भूमिकांची जुगलबंदीप्रेक्षकांसाठी नवी पर्वणी ठरणार आहे.सचिन पिळगावकर आणि स्वप्निल जोशी यांच्यासोबतच सिद्धार्थ चांदेकर, सुचित्रा बांदेकर, आनंद इंगळे आणि नवोदित अभिनेत्री प्रणाली घोगरे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. राकेश सारंग यांनी ‘रणांगण’चं दिग्दर्शन केलं आहे.नात्यांमधल्या या रणांगणाची गोष्ट चुकवू नये अशीच आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘रणांगण’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार २८ ऑक्टोबरला दु. १.०० आणि सायं. ७.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!