भेटी लागी जीवातल्या रंगकर्मी अरूण नलावडेंच्या दर्जेदार भूमिकांमध्ये तात्यांची भर

 

सोनी मराठी वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्यामनात हक्काचे स्थान निर्माण केलंय आणि याचेएकमेव कारण म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरीलमनोरंजक मालिका. या वाहिनीवरील सर्वचमालिका लोकप्रिय होतं आहेत आणि प्रत्येकमालिकेत एक नाविन्य, वैशिष्ट्य आहे. त्यापैकी‘भेटी लागी जीवा’ या मालिकेचे वैशिष्ट्ये म्हणजेया मालिकेतील कलाकार आणि कथा. ३ पिढ्याआणि त्यातील प्रमुख पुरुष मंडळी यांच्या नात्यावरआधारित कथा मांडून सोनी मराठीने एक उत्तममालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. ३ पिढ्या,त्यांचे स्वभाव, त्यांची मतं, त्यांचा एकंदर वावरयाच्या अवती-भवती फिरणारी ‘भेटी लागीजीवा’ची कथा खूप सुंदर पध्दतीने मांडली जातआहे. आणि ही कथा तितक्याच सुंदर पध्दतीनेयातील ३ पिढ्यांतील प्रमुख पुरुष पात्र साकारणारेकलाकार अरुण नलावडे (तात्या), समीरधर्माधिकारी (विकास) आणि श्रेयस राजे (विहंग)यांनी पडद्यावर सादर केली आहे. एकापाठोपाठ एक दर्जेदार भूमिका करणारे ज्येष्ठरंगकर्मी अरूण नलावडे तात्यांच्या रूपातप्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या पात्राचंवैशिष्ट्य म्हणजे जागोजागी भारूडाचे कार्यक्रमकरणाऱ्या तात्यांच्या वाणीत ऐकू येणाऱ्या ओव्याआणि त्या ओव्यांभोवती गुंफलेलं तात्यांचं आयुष्य.डिजे-रिमिक्स च्या या काळात गवळण, भारूड,भजन, किर्तनसारखे शब्द कानावर पडणं दुर्मिळचं.मात्र सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या यामालिकेच्या निमित्ताने कानी पडणारे हे शब्दप्रेक्षकांना खूपच भावत आहेत. त्यात तात्यांकडूनया एकंदर नाट्याला मिळणारी भारूडाची जोडकौतुकास्पद आहे. केवळ भारूड किंवा किर्तनचनाही तर अरूण नलावडे म्हणजेच तात्यांना दिलेलेसंवाद ही तितक्याच ताकदीचे आहेत. हल्लीच्याचएका भागात, ” आशिर्वादाला ओझं समजून परतकरायला आले की काय…” म्हणणाऱ्या तात्यांचेसंवाद भाव खाऊन जात आहेत. त्यात मालिकेच्याअनुशंगाने सादर होणारं भारूड प्रेक्षकांना आपल्यामुळांशी घट्ट जोडून ठेवत आहे.भारूडाशी जोडलेली तात्यांची पिढी, बिझनेस हेचसर्वस्व समजणारा मध्यमवयीन विकास आणितारूण्याशी नुकतीच ओळख झालेला तरूणम्हणजे विहंग.  मुलगा-वडील-नातू अशी ही तीनपिढी, त्यांच्यातील पुरेसा नसणारा संवाद, भावनायावर आधारितल ‘भेटी लागी जीवा’ मालिकेतीलया तिघांच्या नात्यामध्ये पडलेली दरी कशी भरतजाते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  अरुणनलावडे, समीर धर्माधिकारी आणि श्रेयस राजेयांनी त्यांच्या भूमिका इतक्या चोख पार पाडल्याआहेत की ही कथा जणू आपल्या सभोवतालीघडतेय असं वाटून प्रेक्षक मालिकेला मनापासूनदाद देत आहेत. आजोबा आणि नातू यांची योगायोगाने झालेलीभेट प्रेक्षकांसाठी आनंददायी क्षण असेल पणत्यांच्या नात्याची खरी ओळख त्यांना कधी होईल हेजाणून घेण्यासाठी पण प्रेक्षक नक्कीच उत्सुकअसतील. आपल्या वडीलांना भेटवण्यासाठी जेव्हाविहंग तात्यांना घेऊन त्याच्या घरी जाईल तेव्हाकाय घडेल अन् कसं घडेल हे पाहण्यासाठी बघतराहा ‘भेटी लागी जीवा’ सोमवार ते शनिवार रात्री१०:३० वाजता फक्त सोनी मराठी वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!