
कोल्हापूर : कोल्हापुरातील तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या साखर उद्योगाशी संबंधित परिपूर्ण आणि अचुक माहितीसाठी प्रसिद्ध असणारे देशातील हे पहिले चिनीमंडी या साखर पोर्टलला नुकताच “ऑल इंडिया असिव्हर्स फौंडेशन” तर्फे “आऊटस्टँडिंग अचीवमेंट अवार्ड फॉर बिझनेस एक्सलन्स” हा पुरस्कार ज्येष्ठ वकील व भाजपा प्रवक्ते श्री अमन सिंघ यांच्या हस्ते देण्यात आला .हा कार्यक्रम दिल्ली येथे संपन्न झाला. साखर उद्योगामध्ये चिनीमंडी इन्फेर्मेटीव्ही पोर्टल मुळे डिजिटल झाली आहे. साखर उद्योग क्षेत्र हे देशातील नंबर दोनचे क्षेत्र आहे या क्षेत्रावर आपल्या देशाचे अर्थकारण अवलंबून आहे .
इनोप्लेट्स इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीचा चिनीमंडी हा उपक्रम असून या कंपनीचे सर्व संचालक हे साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योजक असून त्यांनी या व्यवसायात आपले तीस ते चाळीस वर्षे काम केलेले आहे त्यांना या उद्योगाच्या परिपूर्ण व व्यापक अनुभव आहे. चिनीमंडीतर्फे जगभरात प्रथमतः चिनीमंडी इन्फर्मेटिव्ह वेब पोर्टल सुरू केले आहे
हे पोर्टल मराठी, हिंदी ,इंग्रजी व गुजराती भाषेत जोरात सुरू आहे त्यामुळेच यांना “शुगर का सर्च इंजिन “असे म्हटले जाते .कारण साखर उद्योगाशी निगडित सर्व काही एकाच क्लिकवर या वाक्यात ते परिपूर्ण आणि सार्थ ठरले आहे. त्यामुळेच या उद्योगाशी जवळजवळ ८० टक्के साखरेशी निगडीत भागधारक चिनीमंडी शी जोडले गेले आहेत. ज्यामध्ये कारखानदार यांपासून शेतकरी वर्ग जोडला गेला आहे .
चीनीमंडी वेब पोर्टलवर निगडित जागतिक बातम्या, मुलाखती, पब्लीक पोल, सरकारची धोरणे ,साखर डायरी, एन सी डी एक्स बद्दल माहिती ,साखरेचे दैनंदिन भाव शेअर मार्केट ची माहिती साखरेचे टेंडर ऑर्डर ट्रेडिंग व्हिडीओ, साखरेचे होणाऱ्या आगामी परिषद अशा बऱ्याच साखर उद्योगाशी संबंधित बाबी पोर्टल वर मोफत पहावयास मिळतात. त्याचबरोबर येणाऱ्या काळाची गरज ओळखून चिनी मंडी हे पोस्ट कास्ट रूपात सुद्धा असणार आहे. त्यामुळे साखर उद्योग बद्दलची माहिती ऑडिओ क्लिप रूपात ऐकावयास मिळणार आहे .
या पोर्टलमुले साखर उद्योगात डिजिटल क्रांती केली आहे. शिवाय हे पोर्टल मोबाईल ॲप रूपात प्रत्येकांच्या मोबाईल मध्ये पहावयास मिळणार आहे.
चिनीमंडीचे सर्वेसर्वा उपल शाह यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण डिजिटल क्रांती करून सरळ साध्या व सर्वांना कळेल अशा भाषेत आम्ही सेवा देऊन सर्वांना डिजिटल युगाकडे नेण्याचा प्रयत्न करणार असणार आहे असे सांगितले आहे.
Leave a Reply