
कोल्हापूर : सनरीच ट्रॅव्हल्स ही सनरिच ग्रुप ऑफ कंपनी मधील एक कंपनी आहे गेल्या दहा वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून ग्राहकांना पर्यटकांना चांगल्या पद्धतीची सेवा ही सनरीच ट्रॅव्हल कंपनी देते या कंपनीच्या तीन शाखा असून चौथी शाखा कोल्हापूर मध्ये सुरू करण्यात आली आहे अशी माहिती सूनरीच ट्रॅव्हल्स चे जनरल मॅनेजर अजित मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली .
प्रत्येकाना विविध ठिकाणी सहलीला जाण्याची आवड असते त्यासाठी चांगल्या सोयी सुविधा मिळणे आवश्यक असते पर्यटकांचा नेमका हाच धागा लक्षात घेऊन सदर ट्रॅव्हल्स कंपनी कोल्हापूर मध्ये पर्यटकांच्या सेवेत रुजू होत आहे या ट्रॅव्हल्स कंपनीच्या वतीने दर्जेदार सुविधा दिल्या जाणार आहेत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ग्रुप टुअर्स, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शैक्षणिक सहली, एम आय सी इ टूअर्स,कास्टमाईज ग्रुप टुअर्स, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय तीर्थ सहली तसेच व्हिसा, सर्विस ट्रॅव्हल ,इन्शुरन्स इन्शुरन्स ,फॉरेन एक्स्चेंज, आधी सुविधा दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय सहलीचा आनंद या कंपनीतर्फे मिळणार आहे
ही ट्रॅव्हल कंपनी पर्यटकांना पिक अप अँड ड्रॉप ची सोय उपलब्ध करून देणार आहे शिवाय टूर सोबत गाईड असणार आहे तो त्या त्या ठिकाणची ओळख पर्यटकांना करून देणार आहे योग्य व माफक दरात पर्यटकांना परवडेल अशी टूर ही ट्रॅव्हल कंपनी उपलब्ध करून देणार आहे असे मोहिते यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले सनरीच ग्रुप ऑफ कंपनीचे जाळे संपूर्ण जगभर पसरलेले आहे याचा उपयोग प्रवाशांना नक्कीच होईल अशी खात्री अजित मोहिते यांनी व्यक्त केली आहे कोल्हापूर मधून बरेच पर्यटक विविध ठिकाणच्या टूरला जात असतात हा ग्राहक वर्ग ओळखून कोल्हापूरमध्ये कंपनीने कार्यालय सुरू केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले कोल्हापूर मधील हे कार्यालय वरिष्ठ प्रतिनिधी कविता चव्हाण या सांभाळणार आहेत.
Leave a Reply