सौंदती यात्रेवरील खोळंबा आकार पूर्ण रद्द करावा:आ.राजेश क्षीरसागर 

 

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री रेणुका देवीची यात्रा प्रतिवर्षी प्रमाणे येत्या डिसेंबर महिन्यात होत आहे. सदर यात्रेकरिता कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जात असतात. सदच्या यात्रेकरिता गेली २५ ते ३० वर्षे रेणुका भक्त एस.टी. ने जात आहेत. अलीकडच्या काळामध्ये वाहतुकीच्या नवनवीन सुविधा उपलब्ध असताना देखील सदरच्या यात्रेकरिता एस.टी.ला पसंती दिली जाते. सौंदती यात्रेकरिता शहरातून जवळपास २०० एस. टी. गाड्या प्रासंगिक कराराद्वारे बुकिंग केल्या जातात. या गाड्यांच्या खोळंबा आकारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भाविकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम काहींकडून होत होते. परंतु, रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी केलेल्या मागणी नंतर आपण यात लक्ष घातले असून, परिवहन मंत्री नामदार दिवाकरजी रावते यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सन २०१५ च्या तुलनेत गतवर्षी प्रत्येक एस. टी. गाडी मागे ७८५६ रुपये कमी करण्यात आले होते. गतवर्षी सुमारे ५० टक्के खोळंबा आकार कमी केला असून यावर्षी सौंदती यात्रेवरील खोळंबा आकार पूर्ण रद्द करावा, अशी मागणी आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे परिवहन मंत्री नाम. दिवाकरजी रावते यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.डिसेंबर महिन्यात होणाऱ्या सौंदती यात्रेच्या अनुषंगाने कोल्हापूरसह आसपासच्या भागातून सौंदती यात्रे करिता जाणाऱ्या भाविकांना योग्य सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी परिवहन मंत्री नाम. दिवाक्ररजी रावते यांची मुंबई येथे भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!