
कोल्हापूर :कार्यकर्त्यांच्या ताकतीवर मी मोठा झालोय त्यामुळे मला प्रत्येक कार्यकर्त्याची जाण आहे. मी माझ्या राजकीय ताकदीचा वापर विकास कामासाठी केलाय. परंतु ज्यांचा धर्मच फसवणुकीचा आहे आणि पाया गद्दारीचा आहे त्यांना माझी विकास कामे कशी दिसणार, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.
करवीर तालुक्यातील नंदगाव येथील विश्वासराव दिंडोर्ले-नाना यांच्यासह जवळपास 400 कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा कार्यालयात आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन सतेज पाटील गटात प्रवेश केला. आमदार सतेज पाटील यांनी विश्वासराव दिंडोर्ले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना विश्वासराव दिंडोर्ले यांनी सर्व कार्यकर्त्यांनी आता एकत्र येऊन 2019 चा लढाईसाठी तयारीला लागा, अस आवाहन केलं. दिंडोर्ले गटाच्या अनेक मान्यवर कार्यकर्त्यानि आपल्या मनोगतात यापुढच्या काळात आपण आमदार सतेज पाटील यांच्याशी प्रामाणिक राहून कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. यावेळी नंदगावचे उपसरपंच किशोर दिंडोर्ले, विलास चौगले, मधुकर शिंदे, आण्णा सांगावे, दिनू दिंडोर्ले, चंदर चौगले, बाळासो हंचनाळ, आण्णासो गोनुगडे, मारुती झांबरे, मारुती चव्हाण, विजय कोंडेकर, बंडा वाघमारे, तानाजी कुराडे, यशवंत दिंडोर्ले, जयदीप चौगले, सरदार नरके, रणजित हंचनाळे, मारुती नलवडे, उमाजी शिंदे, म्हालजी साजने, आनंद पाटील, अनिल जगताप, अर्जुन नलवडे, राहुल कुराडे, नानासो बेनके, दिंडनेर्लीचे माजी सरपंच संभाजी बोटे, गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगले, पाचगावचे आनंदा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply