रसिकांसाठी ‘गुणीदास’ची दिवाळी पहाट

 

कोल्हापूर : (अक्षय थोरवत) दिपावली निमित्ताने यंदाही गुणीदास फाउंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्यावतीने ‘स्वर दीपावली’ या मराठी भावभक्ती गीतांची प्रातःकालीन  मैफिल येत्या रविवार दि 4  नोव्हेंबर रोजी ठीक सकाळी 6 वा केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. कोल्हापूर रसिकांची दिवाळी पहाट आनंदात व्हावी यासठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून कार्यक्रम सर्व रसिकांच्या साठी मोफत असून सहकुटुंब या कार्यक्रमाचा अस्वाद घ्यावा असे आवाहन गुणीदासच्या वतीने राजप्रासाद धर्माधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

     कोल्हापूर रसिकांना जास्तीत जास्त उच्च दर्जाच्या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी गेली ७ वर्षे ‘गुणीदास’ सातत्याने प्रयत्न करत आहे. कोल्हापुरातील आणि कोल्हापूर बाहेरच्या प्रतिथयश आणि प्रतिभावंत उदयोन्मुख कलाकारांना या निमित्त आमंत्रित केले जाते. यंदाही दिपावली निमित्ताने ‘स्वर दीपावली’ कार्यक्रमाचे आयोजन केले असून मराठी भावभक्ती गीतांची प्रातःकालीन मैफिल रंगणार आहे. या मध्ये  धनश्री गाडगीळ, ओंकार कुष्टे आणि सुकृत ताम्हणकर या सुप्रसिद्ध गायक कलाकारांचे  गायन होणार असुय्न याचा अस्वाद रसिकांना घेता येईल तसेच विक्रम पाटील, साहेबराव सनदी, पद्मनाभ जोशी आणि राजप्रसाद धर्माधिकारी या कलाकारांच्या साथसांगतीचा आनंद रसिकांना घेता येईल.

     तसेच गुणीदास प्रथमच हुपरीच्या रसिकांच्यासाठीही कार्यक्रम करत असून अंबाबाई भक्त मंडळ या संस्थेच्या सहकार्याने हुपरी येथे दि 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वा कार्यक्रम होणार आहे. येथील कार्यक्रमात सायली तळवलकर आणि महेश हिरेमठ या कलाकारांच्या गायनाचा अस्वाद हुपरीच्या रसिकांना घेता येईल.

     दि ४ नोव्हेंबर रोजी सायं ४ वा. गुणीदास फौंडेशन, आणि महाराष्ट्र नाट्य परिषद सांगली शाखेच्या सहकार्याने ‘विष्णुदास भावे नाट्यगृह येथे दीपावली आणि रंगभूमीदिन निमित्त ‘दिपसंध्या’ हा कार्यक्रम सादर करणार आहे.

तरी सर्व रसिकांनी गुणीदासची दिवाळी पहाट सोबत सहभागी होऊन कार्यक्रमाचा अस्वाद घ्यावा तसेच या कार्यक्रमानिमित्त पणत्यांची रोषणाई करण्यात येणार आहे त्या करिता रसिकांनी कार्यक्रम स्थळावर पहाटे 5.30 वा उस्फुर्त पणे पारंपारिक वेशभूषेत  हजर राहून आपला सहभाग नोंदवावा असे गुणीदास फाउंडेशनचे राजप्रासाद धर्माधिकारी यांनी पत्रकांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!