आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतुन साकारली “माणसुकीची भिंत”

 

कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येणारी माणसुकीची भिंत ही समाजातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करून गरिबांना श्रीमंतांच्या जवळ आणण्याबरोबर समाजात सकारात्मक, होकारात्मक आणि रचनात्मक चळवळ उभी करते असं प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केलं. ते सीपीआर चौकात उभी करण्यात आलेल्या माणुसकीच्या भिंत उपक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते.
देणाऱ्याने देत जावे घेणारे घेत रहावे ही दातृत्वाची भावना मनात ठेऊन आमदार सतेज पाटील आणि मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरातील सीपीआर चौकात यंदा तिसऱ्या वर्षी पुन्हा एकदा दीपावलीचे औचित्य साधून दीपावलीच्या पूर्व संध्येला उभी करण्यात आलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमाचे उदघाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोद्रें यांच्या हस्ते गरजूंना कपडे वाटप करून झाली. या उदघाटनाप्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणारा सण आहे. कोल्हापूर हे पुरोगामी, सुधारणावादी आणि प्रगल्भ विचारांचे शहर आहे. अशा या शहरात आमदार सतेज पाटील यांनी माणुसकीची भिंत उभी करून समाजातील दुरावा निर्माण करणाऱ्या भिंती बाजूला केल्या आहेत. या माणुसकीच्या भिंतीतून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. हा उपक्रम यशस्वी असून या उपक्रमामुळे सकारात्मक, होकारात्मक आणि रचनात्मक चळवळ उभी राहत असल्याचे मत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केलं.या प्रसंगी आमदार सतेज पाटील यांनी मानवतेची भिंत या संकल्पनेतून नको असलेले समाजातील गरजूंना द्यावे या उद्देशाने तिसऱ्या वर्षी हा उपक्रम हाती घेतला आहे. याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी या उपक्रमाला सहकार्य केलंय त्यांचे आभार मानले ही माणुसकीची भिंत ही संकल्पना कोल्हापूरपूरती मर्यादित न राहता मुंबई, पुणे आणि सांगली या ठिकाणी पोचली आहे. दिवाळीच्या पूर्व संध्येला समाजातील गरजूंना या माध्यमातून काहीतरी देता येते याचे समाधान मिळत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
समाजात अनेक गरजू आहेत जे काबाड कष्ट करून आपले पोट भरतात. त्यांच्यासाठी दिवाळी साजरी करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून गरजूंना कपडे मिळतात. हीच खऱ्या अर्थाने त्यांची दिवाळी असते. अस महापौर शोभा बोद्रें यांनी सांगितले.
माणुसकीची भिंत या उपक्रमाला सुरवात होताच समाजातील अनेकांनी कपडे आणून दिले आणि अनेकजन हे कपडे घेऊन गेले. या उपक्रमाला समाजातून भरभरून प्रतिसाद मिळाला. क्रांतिसिंह नाना पाटील इथल्या दयाताई कामाने यांचा मुलगा 2007 साली गडचिरोली इथं शाहिद झाला. त्याने देशासाठी आपलं बलिदान दिलं. त्याचे कपडे आणि वस्तू दयाताईंनी या उपक्रमात अर्पण केल्या. आपल्या मुलाने देशासाठी बलिदान दिले. त्याच्या वस्तू गरजूंना उपयोगी पाडाव्यात यासाठी या उपक्रमात दिल्या असल्याचे दयाताई कमाने यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी उपमहापौर महेश सावंत, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती सुरेखा शहा, सभागृहनेता दिलीप पोवार, नगरसेवक अर्जुन माने, शारंगधर देशमुख राहुल माने गणी आजरेकर संजय मोहिते सुभाष बुलड प्रतापसिंह जाधव मोहन सालपे, दुर्वास कदम प्रशांत पोकळे, संतोष पाटील, डॉ देवेद्र रासकर सचिन पाटील मयुर पाटील प्रसाद पाटील, अमरसिंह पाटील, सुरज पाटील, इम्तीयाज मोमीन कैलास पाटील पुजा पाटणकर, इंद्रजित बोद्रे दुर्वास बापू कदम, शिवानंद बनछोडे, अशपाक आजरेकर, अभिजित देठे, प्रवीण लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!