
कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक श्री करवीर निवासिनी अंबाबाई बाईला कलकत्त्यातील एका भक्ताने एक किलो सोन्याचा किरीट अर्पण केला. या किरिटामध्ये हिरे, माणिक असून पारंपरिक पद्धतीचे लिंग,नाग अशी चिन्हे आहेत. कोल्हापुरातील कारागिरांनी हा किरीट बनवलेला आहे. याची किंमत 32 लाख रुपये इतकी होते. आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी हा किरीट सुपूर्त केला. कलकत्त्यातील एका भक्ताला देवीला अर्पण करण्याची इच्छा झाली ती आज पूर्ण झाली. देवी अंबाबाई या भक्ताला नक्कीच प्रसन्न झाली असणार म्हणूनच नवस फेडण्यासाठी त्या भक्ताने किरीट अर्पण केल्याचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्पष्ट केले. त्यानंतर धनत्रयोदशीनिमित्त यथासांग पद्धतीने हा किरीट देवीच्या मस्तकावर घालण्यात आला. विविध उत्सवादिवशी देवीच्या मस्तकावर किरीटचढवण्यात येणार आहे. यावेळी संगीताताई खाडे, शिवाजी जाधव, धनाजी जाधव, भरत ओसवाल आदी उपस्थित होते.
Leave a Reply