
वेस्टर्न महाराष्ट्र कन्व्हर्जन्स माहितीपुस्तिकेचे प्रकाशन
कोल्हापूर :ग्रामिण भागात शेती वाढली पाहिजे हे खरं असलं तरी, सध्या शहरात वाढणारी बेरोजगारी रोखण्यासठी औद्योगिकरण वाढणे आवश्यक आहे. जागतिक औद्योगिक विचारांची आदानप्रदान स्थानिक उद्योजकांशी होेणे आवश्यक आहे. उद्योगात टिकण्यासाठी बाहेरच मार्केट वाढवणं आवश्यक असून या प्रदर्शनातून ही औद्योगिक विचारांचे आदानप्रदान वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चद्रकांतदादा पाटील यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रि अॅन्ड एग्रिकल्चर यांच्या वतीने दि.१५ ते १८ डिसेंबर दरम्यान ‘वेस्टर्न महाराष्ट्र कनव्रजन्स २०१८‘ या औद्योगिक प्रशर्दनाचे आयोजन करण्यात आले आहे. मेक इन इंडिया च्या धर्तीवरील उद्योगक्षेत्राशी निगडित असणार्या या प्रदर्शनाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हॉटेल पॅव्हेलियन येथे झालें. यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांतदादा पुढे म्हणाले, उद्योजकांच्या ज्या काही समस्या आहेत. दरमहा घेण्यात येणार्या बैठक़ीत सोडवल्या जातील. त्याशिवाय नवे उद्योग, व्यवसाय सुरु होणार नाहीत. औद्योगिक प्रश्न साचले की त्यांचा कल ते न सोडवण्याकडे असतो. यासाठीच स्थानिक उद्योजकीय संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून हे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याकडे भर दिला जाईल. या प्रदर्शनाला सर्वतोपरी सहकायं करण्याची ग्वाही ही त्यांनी दिली.
प्रास्ताविक करताना महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स चे ललित गांधी म्हणाले, उद्योगक्षेत्राला बळ देणार्या महत्वपूर्ण अशा योजना राबवण्याच्या घोषणा सरकारने केल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी योग्य वेळेत व्हावी. त्याचप्रमाणे डिफेन्स क्लस्टरचे प्रायव्हेट क्लस्टरमध्ये कनवरजन होणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये ही प्रक्रिया झाली आहे. पण ही प्रक्रिया कोल्हापूरातही राबवली जावी. डिसेंबरमध्ये होणार्या या प्रदर्शनाला विविध राज्यांसह साउथ कोरियाचाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आपेक्षा व्यक्त केली. या प्रदर्शनाच्या निमित्ताने उद्योगासाठी उपलबध असलेले नवीन तंत्रज्ञान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेल्या नवीन संधी नवीन ग्राहकांची ओळख अशा विविध विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्रे आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रदर्शनात पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासह देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. ज्या कंपन्यांचा यात समावेश आहे, त्या स्टॉलधारकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोल्हापूरमध्ये होणारे हे प्रदर्शन चौथे प्रदर्शन असून कोल्हापूर, सांगली,सातारा, बेळगाव, कोकण या ठिकाणच्या उद्योजकांना या प्रदर्शनाचा उपयोग होणार आहे.
या प्रदर्शनात समावेश असणाऱ्या कंपन्यांमध्ये गोदरेज सीडी ,किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड ,एस्सार लिमिटेड, गुडवेल इंजिनिअरिंग, टाटा ग्रुप,बॉश, मायक्रोटेक, रिलायन्स ,टेक्नोमेंट एंटरप्राइजेस ,गुडेल आय एन सी, संकल्प इंडस्ट्रीज, दर्शना इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, प्रोफेशनल सपोर्ट , इंटोविस्टा ऑटोमेशन. ब्रिस्क इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लि, मायक्रो लॉग सिस्टिम प्रा. लि., डेल्टा ग्रुप,अत्तार स्टील स्ट्रक्चर प्रा. लि, बालाजी सेल्स कार्पोरेशन ,कोटीभास्कर मटेरियल हँडलिंग इकविपमेंट, सद्गुरु इंजिनियर्स,संपदा पोलिमर, पटावा ग्रुप, सिल्वर लाईन इलेक्ट्रिकस,वारप इंजिनियर्स आदी कंपन्यांचा समावेश आहे.
या प्रदर्शनामध्ये पॅकेजिंग, सोलर, वेविंग मशीन, स्टोंअरेज सिस्टीम, कटिंग टॅल्स, हायड्रोलिक क्रेनस, बेअरिंग, नटबोल्ट मटेरियल हँडलिंग, सीसी सिस्टीम आदी उत्पादने पहावयास मिळणार आहेत.
यावेळी क्रिएटीव्हचे सुजित चव्हाण यांनी प्रदर्शनाच्या आायेजनासंबंधीची विविध माहिती विषद केली.
याप्रसंगी कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएषनचे अध्यक्ष व पदाधिकारी, गोशिमा, मॅक अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरींग असेसिएशनचे अध्यक्ष, सॅटर्डे क्लबचे पदाधिकारी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य जयेश ओसवाल, महावीर गाठ, नितीन धूत, प्रकाश शहा, स्वप्नील शहा आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात तीन तीन खासदार आपापल्या परीने विमानसेवा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे मी त्या प्रश्नाकडे बघत नव्हतो. पण आता या प्रश्नाकडेही मलाच पहावे लागणार, असे विधान पालकमंत्र्यांनी यावेळी केले.यावेळी सिआयआयचे प्रताप झंवर यांनी आणि रिलायन्स पोलिमर्सचे सत्यजीत भोसले यांनी उद्योजकांना हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.
Leave a Reply