
मुंबई: हिंदी चित्रपट जगतात विनोदी भयपट अपवादाने निर्माण होतात,हेच आव्हान सक्षमपणे पेलून ‘कुत्ते कि दुम’ हा नवा विनोदी भयपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून या चित्रपटाच्या संगीताचे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक सावनकुमार टाक यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे या चित्रपटाचे लेखक -दिग्दर्शक सुनील पटेल हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून ते या चित्रपटाचे केवळ दिग्दर्शकच नाहीत तर लेखक आणि संगीतकार सुद्धा आहेत.या चित्रपटाची वेगळी गोष्ट प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.निर्माती सोनिका पटेल,सहनिर्माती शुभ चांदनीपटेल, सादरकर्ते सत्येन्द्रत्रिपाठी यांच्या या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याप्रसंगी चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर मान्यवरांना आणि प्रसिद्धीमाध्यमांना दाखवण्यात आला आणि साऱ्यांनीच त्याची प्रशंसा केली.या चित्रपटात तान्या दांग, जस बोपाराय, ललित सिंह राव, राज़ रहमान अली आणि सन्नी मुख्य भूमिकेत असून सिनेमाची मुख्य नायिका तान्या तिच्या भूमिकेबद्दल विशेष आंनदी आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावनकुमार होते,तसेच ब्राइट आउटडोर चे योगेश लखानी या कार्यक्रमाची जान होते.यावेळी सावनकुमार यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.जो सतत चुका करतो त्याची गोष्ट सांगणारा हा इंडियन करीफिल्म्सच्या बॅनर खाली निर्माण झालेला ‘कुत्ते कि दुम’ येत्या २ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Leave a Reply