
कोल्हापूर: माणुसकीची भिंत हा उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून गेली तीन वर्षे सुरू आहे .या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला .पण गेले काही दिवस लोकांना जुनी कपडे दिली असा वारंवार उल्लेख खा .धनंजय महाडिक करत आहेत. त्यांनी असे म्हणणे म्हणजे कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा अपमान आहे.आमच्या उंचीला येऊन काम करावे,आमचे पाय कापून उंची गाठण्यासाठी प्रयत्न करू नये असा इशारा आज ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमातील सर्व सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिला.यावेळी गणी आजरेकर म्हणाले” आम्ही 3 लाख कपडे वाटप केले असे म्हटले आहे, पण खासदार मात्र 3 लाख लोकांना कपडे वाटले, असा चुकीचा उल्लेख करत आहेत .एका सामाजिक उपक्रमाची राजकीय द्वेषातुन त्यांनी कुचेष्टा करू नये.त्यांनी या उपक्रमाची योग्य माहिती घेऊन बोलावे”.
तीन वर्षांपूर्वी व्हाट्सअँप् ग्रुप च्या माध्यमातून आणि वॉल ऑफ हुम्यांनीटी च्या धर्तीवर आम्ही हा उपक्रम सुरू केला.यात कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील लोक आहेत .ज्यावेळी आमदार सतेज पाटील यांना या उपक्रमाची माहिती कळली, त्यांनी त्यावेळी यात सामाजिक भावनेतून सक्रिय सहभाग घेतला .आणि सलग तीन वर्षे हा उपक्रम सुरू आहे .याचे अनुकरण महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यात सुद्धा झाले आहे .असेही सदस्य प्रसाद पाटील, अमर पाटील यांनी स्पष्ट केले.
पण या उपक्रमाबद्दल खासदार महाडिक जुनी कपडे वाटतात, असा वारंवार उल्लेख करत आहेत. मागील वर्षी आपणसुद्धा या उपक्रमात कपडे दिली असेही ते म्हणतात .मग ती कपडे त्यांनी घरातील जागा रिकामी करायला दिली होती का ?
कोल्हापूरच्या लोकांनी धूऊन आणि स्वच्छ इस्त्री करून कपडे आणून दिली आहेत. आपल्याला कोणाला तरी मदत करायची आहे आणि ‘माणूसकीची भिंत’ हा उपक्रम त्यासाठी योग्य आहे ,हा विश्वास वाटल्याने लोकांनी कपडे आणून दिले. गयाताई कमाने यांनी शहिद मुलाचे कपडे आणून दिले.गोव्यातील अधिकारी यांनी कुरिअरने कपडे पाठवले.मंगळवार पेठेतील युवकाने स्वतः भागातून फिरून 10 पोती कपडे आणून दिले.मुक्त सैनिक वसाहत मधील जेष्ठ नागरिकांनी 4 पोती कपडे आणून दिले .अनेक लोकांनी पिशव्या, बॅगा भरून कपडे टेम्पो, जीप यातून आणून दिले .कोल्हापूर मधील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून या उपक्रमाला शुभेच्छा देत कपडे दिले अशा प्रकारे हा उपक्रम एक लोकचळवळ बनला आहे .कपडे जुने की नवे यापेक्षा देण्याची भावना महत्वाची आहे .शहिद मुलाच्या जुन्या कपड्याची किंमत होऊ शकते का ? लोकांची दान करण्याच्या भावना अमूल्य आहे .त्यामुळे मी नवे कपडे दिले आणि त्यांनी जुने दिले असा भेदाभेद खा.महाडिक यांनी करू नये.
एकीकडे ‘माणुसकीची भिंत’ चे अनुकरण करून आपण आपुलकीची भिंत सुरू केली असे म्हणायचे आणि दुसरीकडे जुनी कपडे दिली असे कुचेष्टेने म्हणायचे , हे कितपत योग्य आहे ?
आणि यावर्षी उपक्रमाची माहिती देताना आम्ही दोन वर्षात 3 लाख इतके कपडे गरजूंना दिले असे म्हटले होते .मात्र खा .महाडीक चुकीच्या माहिती च्या आधारे 3 लाख लोकांना कपडे कसे दिले ? असे चुकीचे विधान करत आहेत.त्यांचे गणित चुकले आहे , असे आम्हाला वाटते .
यंदा 2 हजार 365 लोकांनी दिलेले दीड लाखाहुन अधिक कपडे आम्ही वाटप केले आहेत .त्यामध्ये अनेक गरजूनी उपक्रमाच्या ठिकाणी येऊन कपडे नेले .तर उर्वरित कपडे राजाराम, शरद नरंदे, मंडलिक हमिदवाडा, डी वाय . पाटील गगबावडा आदी साखर कारखाना ठिकाणी वाटले आहेत.
शिवाय अनेक लोकांनी नवीन कपडे सुद्धा आणून दिले आहेत .दिवाळी मध्ये अनेकांनी संयोजकांकडे नवीन कपडे दिले आहेत .लवकरच याचे वाटप करणार आहोत . यावेळी सचिन पाटील,सुरेश मिरजकर, इम्तियाज मोमीन, प्रवीण पाटील, मयुर पाटील आदी कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते .
Leave a Reply