
कोल्हापूर : गेल्या सात वर्षांपासून गोरगरीब, वंचित लोकांना अव्याहतपणे मदत करणे यापेक्षा मोठी दिवाळी नाही. स्वत: नवीन कपडे घालणे, फटाके फोडणे, अत्तर लावणे हे सगळेच करीत असतात; परंतु महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना वंचित लोकांच्या चेहºयावर हसू फुलविण्याचे आदर्श काम करीत आहे, असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी काढले.दिवाळीनिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या हसिना शेख यांच्या वतीने पोलीस मुख्यालयात वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, फिरस्ते अशा समाजातील वंचित लोकांसाठी ‘उपेक्षितांची दिवाळी’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या राज्यपदाधिकारी हसीना शेख होत्या. समाजातील महिला व पुरुषांना नवीन कपडे व फराळाचे वाटप पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, दिव्यांच्या रोषणाईने सभोवताचा अंधकार तर दूर होतोच; परंतु दारिद्र्याने जीवनाची केलेली दुर्दशा कुठलाच दिवा प्रकाशमय करू शकत नाही. गरिबांसाठी मदतीचा हात देण्याची वेळ आली की रस्त्याकडेने पळ काढणारेही अनेक असतात. बोलण्यापेक्षा कृती करणे अधिक प्रभावी ठरते. उपेक्षितांची दिवाळी साजरी करणाºया महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे काम समाजात माणुसकी आणि प्रेम निर्माण करणारे आहे.
यावेळी जिल्हाध्यक्षा जयश्री मगदुम, शामलाल बचराणी निलेश सुतार, सागर पाटील;, पुनम यादव, फरजाना नदाफ, शोभा पाटील, लता पवार, संग्राम पाटील, रोहीत नाळे, संग्राम खोत, पंकज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply