
दर तिसऱ्या मिनिटाला एस कुटुंबातील एक एससीव्ही (स्मॉल कमर्शिअल व्हिइकल) विकली जाते, हा मैलाचा टप्पा साजरा करताना खास योजना सादर
सणांचे दिवस आता सुरू होताहेत. अशात, टाटा मोटर्सने टाटा एस या अत्यंत प्रसिद्ध अशा छोट्या व्यावसायिक गाड्यांचे (स्मॉल कमर्शिअल व्हिइकल) यश साजरे करण्यासाठी ‘तीन का त्योहार’ ही नवी योजना सादर केली आहे. आजवर कंपनीने २० लाखांहून अधिक टाटा एस गाड्या विकल्या आहे. दर तीन मिनिटाला एस वर्गातील एक गाडी विकली जाते. हे यश साजरे करताना कंपनीने स्मॉल कमर्शिअल व्हिइकलच्या (एससीव्ही) ग्राहकांसाठी तीन आकर्षक सवलतींची घोषणा केली आहे.
यंदाच्या सणांत खरेदी केलेल्या प्रत्येक टाटा मोटर्स एससीव्हीवर ग्राहकाला एक मोफत सोन्याचे नाणे, १० लाखांचा वैयक्तिक विमा आणि आकर्षक मासिक ग्राहक योजना जिंकण्याची संधी मिळणार आहे. वाहनाची खरेदी कोणत्या भागात होते त्यावर योजना अवलंबून असेल. नव्याने सादर करण्यात आलेल्या टाटा एस गोल्डसह व्यावसायिक वाहनांच्या संपूर्ण एससीव्ही रेंजवर ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत ही योजना लागू आहे.
या मोहिमेबद्दल टाटा मोटर्सच्या विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख श्री. आर.टी. वासन म्हणाले, “२००५ मध्ये सादर झाल्यापासून टाटा एसने भारतातील एससीव्ही विभागाचे नेतृत्वस्थान पटकावले आहेच. त्याचबरोबर हजारो व्यावसायिकांना ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टीक क्षेत्रात आपल्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात साह्य केले आहे. दर तिसऱ्या मिनिटाला टाटा एसची एक गाडी विकली जाण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठताना आम्ही नव्या ग्राहकांना विविध सवलती देऊन हे यश साजरे करण्याचे ठरवले. या मोहिमेच्या नुसत्या चर्चेनेही शोरूमला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. येणारे सणांचे दिवस आणि पुढील दोन महिन्यांत खरेदी केल्या जाणाऱ्या प्रत्येक एससीव्हीवर टाटा मोटर्सतर्फे दिल्या जाणाऱ्या आकर्षक सवलती यामुळे टाटा एससीव्हीजच्या विक्रीत वाढ होईल, अशी आशा आहे.”
या सणासुदीच्या काळात संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी टाटा मोटर्सने प्रिंट, रेडियो आणि डिजिटल विपणन मोहीम आखली आहे. सर्वोत्कृष्ट उत्पादने आणि सेवेचा अनुभव देण्याचे आपले वचन कंपनी यापुढेही पाळणार आहे.
एस रेंजमध्ये छोटी व्यावसायिक वाहने येतात. उत्कृष्ट सुरक्षा, विविध परिस्थितींमध्ये कमाल कामगिरी, देखभालीसाठी अगदी सहजसोपी अशी या गाड्यांची वैशिष्ट्ये आहेत. ई-कामॅर्स डिलिव्हरी पासून स्वच्छ भारतासाठी प्रयत्न करणे अशा अनेक कामांमधील विविध व्यावसायिक गरजांसाठी या गाड्या वापरता येतात.
Leave a Reply