
कोल्हापूर: मानवाच्या कल्याणासाठी शिक्षण हे फार प्रभावी साधन आहे . विद्यार्थ्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी संशोधन करावे , असे प्रतिपादन डॉ .डी.वाय .पाटील यांनी केले .कसब बावडा येथील डॉ .डी.वाय .पाटील विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले .यावेळी कुलपती डॉ .संजय डी .पाटील, मार्गदर्शक डॉ .एस.एच .पवार उपस्थित होते .यावेळीस्टार्ट अप इंडिया अंतर्गत स्टार्टअप हिरो ऑफ द स्टेट ठरलेल्या अभिनंदन पाटील, तसेच दीपक सावंत आणि नईम मुल्ला यांचा डॉ .डी.वाय .पाटील यांनी सत्कार केला.
डॉ .पाटील पुढे म्हणाले , या विद्यार्थ्यांनी स्टार्ट अप स्पर्धेत मिळवलेले यश विद्यापीठासाठी भूषणावह आहे .या विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन हे समाजाचे प्रश्न लक्षात घेऊन केलेले आहे .या संशोधनातून समाज हित साधले जाणार आहे .या विद्यार्थ्यांनी संशोधनात सातत्य ठेवावे , असे ही त्यांनी नमूद केले .
डॉ .संजय डी .पाटील यांनी सांगितले की, आम्ही विद्यापीठ मध्ये सतत संशोधनाला प्रोत्साहन दिले आहे .त्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधाही दिल्या आहेत . या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला आहे .
सत्काराला उत्तर देताना अभिनंदन पाटील यांनी घराच्या सत्काराने आनंद झाला असून यामूळे नाविन्यपूर्ण काम करायला हुरुप येईल, असे सांगितले .
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे डॉ .एस.एच .पवार यांचाही सन्मान करण्यात आला .
Leave a Reply