
कोल्हापूर: जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सहाव्या तायक्वांदो स्पर्धेत 100 हून अधिक खेळाडूंनी कोल्हापूर, कराड, मुंबई येथून सहभाग नोंदवला. कोल्हापूर राजारामपुरी येथील महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीच्या हॉलमध्ये स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. तसेच यावर्षी कोल्हापूरच्या पालकांच्या सहकार्यामुळे उद्घाटन करण्यात आले जीएसटीएआरसी कोल्हापूरच्या संघाने तब्बल २२ सुवर्णपदके,१७ रौप्यपदक पदके व १५ कांस्यपदकाची कमाई करत संघासाठी विजेतेपद ट्रॉफी पटकावली तसेच या सेंटरच्या अंधेरी- मुंबई या संघाला उपविजेतेपद ट्रॉफी मिळाली. सुवर्णपदक पटकावणाऱ्या मध्ये आयबनी कुलकर्णी,अनन्या चौगुले, सहना बंदी, गार्गी कणसे जान्हवी माने, आशा कांबळे अभिमान भोसले, आदित्य चव्हाण, अनिश कानेकर अनुप कुशिरे, गौरव पाटील, जयवर्धन शर्मा, प्रतीक रायमाने नमन दवे, रणवीर मगर, रोहन पिसाळ, ऋतुराज माने, साद मोमीन, श्रवण कबाडे,शुभम भनवालकर, सिद्धांत कर्नावट विहान मेहता यांनी सुवर्णपदक पटकावले. तसेच जयबन मोमीन, हिना शेख, श्रीशा गाताडे, जिगीषा सबनीस आयुष शानबाग, अरुण कुलकर्णी, अनिल भोसले प्रथमेश भोसले, रमणदीप साहनी, रुद्र गाताडे, श्रीनाथ बकरे, श्रेयस पाटील, श्रेयस स्वामी, सोहम नागदेव, सुमित जगदाळे, तेजस कुलकर्णी, वैभव पाटील यांनी रौप्यपदक मिळवले. प्रिषा हावळ राजलक्ष्मी अवघडे, प्रिया पाटील, तनवी पाटील,चिन्मय चव्हाण, हर्षवर्धन शेंडे, यशवी वसा दैविक भाटे, करणसिंह पाटील मल्हार विभुते शौर्य रांगोळी वेदांत पाटील विष्णू कुंभार पृथ्वीराज अवघडे यांनी पदकांची कमाई केली स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून प्रशांत शेंडे, अमोल पालेकर, अक्षय कुमार, विनय कांबळे रूपाली पवार यांनी काम पाहिले. तसेच कोल्हापूर सेंटर संघाचे प्रशिक्षक ऋषिकेश इटली, मुंबईचे प्रशिक्षक रोहिदास शिर्के, कराडच्या प्रशिक्षिका साधना पालेकर तसेच संघाचे मॅनेजर रोहित खोडे व प्रीती दवे, सुरज रजपुत यांनी कार्यभार सांभाळला. स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी जीएसटी एआरसी चे सीईओ व तज्ञ ग्रँडमास्टर निलेश जालनावाला, इंदरलाल चौधरी, प्रकाश भोसले भोसले उपस्थित होते सर्व प्रमुख अतिथींचे आभार व स्पर्धेचे सूत्रसंचालन मास्टर अमोल भोसले व मास्टर नवीन दवे यांनी केले.
Leave a Reply