
कोल्हापूर : बाथरूम उत्पादनांचे भारतातील अग्रणी निर्माते असलेल्या रोका बाथरूम प्रोडक्ट्स प्रा. लि. (आरबीबीपीएल) यांनी आपल्या ब्रँडचे महाराष्ट्रातील अस्तित्व बळकट करण्यावर भर देत कोल्हापूर येथे एक्स्क्लुसिव्ह रोका आणि पेरिवेअर शोरूमचे उद्घाटन केले. या भागातील प्रसिद्ध वास्तुरचनाकार, व्यापारी भागीदार आणि विकासक यांच्या उपस्थितीत रोका बाथरूम प्रोडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. केई रंगनाथन यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.रोका हा जागतिक पातळीवरील बाथरूम उत्पादनांच्या क्षेत्रातील एक मोठा ब्रँड आणि पेरिवेअर या भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडची बाथरूम सोल्युशन्स या शोरूममध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उत्पादनांमध्ये फॉसेट्स, बाथटब, बेसिन, डब्ल्यूसी (वेस्टर्न कमोड), शॉवर, किचन सिंक आणि बाथरूम फर्निचर इत्यादी उत्पादनांचा समावेश आहे. हा डिस्प्ले स्टुडियो ३५०० चौरस फुटांमध्ये विस्तारलेला असून या शोरूममुळे या भागातील १०० हून अधिक किरकोळ आणि व्यापारी भागीदार असलेल्या बाजारपेठेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल.
या उद्घाटनाबद्दल प्रतिक्रिया देताना रोका बाथरूम प्रोडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. केई रंगनाथन म्हणाले, “प्रीमिअम बाथरूम सोल्युशन्ससाठी विकसनशील बाजारपेठ असलेल्या कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात अत्याधुनिक शोरूमचे उद्घाटन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या दोन्ही ब्रँडची ताजी आणि विस्तृत उत्पादने उपलब्ध करून देत आमचे ग्राहक (एंड कस्टमर्स) आणि स्पेसिफायर्ससाठी हे शोरूम उत्तम अनुभव उपलब्ध करून देईल. हा स्टुडियो आमची पश्चिमेकडील बाजारपेठ बाजारपेठ बळकट करत आहे आणि बाथरूम क्षेत्रात संभाव्य क्षमता आणि शक्यता सादर करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण प्रेरणादायी झोन तयार करत आहे.”
देशभरात आपले अस्तित्व विस्तारीत करण्यासाठी रोका आणि पेरिवेअर त्यांचे बाजारपेठेतील प्रयत्न अधिक तीव्र करत आहे. कंपनी आपले वितरण वाढवत आहे, नवी उत्पादने सादर करत आहे, ग्राहकस्नेही योजना/ऑफर्स सादर करत आहे, त्याचप्रमाणे विकसनशील बाजारपेठांमध्ये आपल्या ब्रँडचे अस्तित्व वाढवत आहे. आपले नेटवर्क वाढविण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांना उत्तम शॉप फ्लोअर अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी रोकाकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांसह या ऑरगनायझेनशनने गुरूग्राम, लखनऊ, चंदिगड आणि कोची येथे कंपनीच्या मालकीचे पाच स्टुडियो सुरू केले आहेत आणि येत्या काही महिन्यांत अधिक स्टुडियो सुरू करण्याची योजना आहे.
Leave a Reply