महिंद्राने एचसीव्ही ट्रक्स रेंजमध्ये दाखल केला ब्लेझो एक्स

 

मुंबई : महिंद्रा ट्रक अँड बस (एमटीबी) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने लोकप्रिय ब्लेझो ट्रक अपग्रेड करून, एचसीव्ही ट्रक रेंजमध्ये ब्लेझो एक्स दाखल केल्याची घोषणा केली. ब्लेझो एक्स हा ब्लेझोपेक्षा अधिक मायलेज देऊन, तसेच ‘अधिक मायलेज मिळवा किंवा ट्रक परत करा’ ही मायलेजविषयक विशेष व अपूर्व हमी देऊन, वाहतूकदारांची वाढत्या इंधनदराची चिंता मिटवणार आहे.नव्या ब्लेझो एक्समध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत – वाहनाची एअर मॅनेजमेंट सिस्टीम, रोलिंग वैशिष्ट्ये व वाहनाचे रोटेटिंग पार्ट्स यांच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा केली आहे. वाहतूकदारांच्या ऑपरेटिंग कॉस्टमध्ये इंधन हा मुख्य घटक असतो आणि इंधनाचे दर गगनाला भिडलेले असताना ब्लेझो एक्स दाखल केला जाते आहे. नवी ब्लेझो एक्स सीरिज सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे – हॉलेज, ट्रॅक्टर-ट्रेलर व टिपर आणि त्यामध्ये ब्लेझोचे कमालीचे यशस्वी झालेले फ्युएलस्मार्ट तंत्रज्ञान समाविष्ट आहे.कंपनीने काश्मीर ते कन्याकुमारी या दरम्यान, 3,800 किमी एक्स्प्रेस नॉर्थ-साउथ सर्व्हिस कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणाही केली आहे. यामध्ये प्रत्येक 100 किमीवर 41 सर्व्हिस टचपॉइंट्स असतील. त्याबरोबर, 4 तासांमध्ये खात्रीने सर्व्हिसची हमी दिली जाईल किंवा प्रत्येक तासाच्या विलंबासाठी 500 रुपये भरपाई दिली जाईल. अंदाजे 30% ट्रक वाहतुकीला सेवा देणाऱ्या मुंबई-दिल्ली सर्व्हिस कॉरिडॉरनंतरचा हा दुसरा असा कॉरिडॉर आहे.यानिमित्त बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा म्हणाले, “ब्लेझो दाखल झाल्यापासून, ब्लेझोने अनेक बाबतीत महिंद्राच्या सीमा विस्तारल्या आहेत, मग तो व्हॉल्युम किंवा बाजारहिस्सा असो किंवा व्यवसायाला नवसंजीवनी मिळण्यासाठी पाया रचणारी या उद्योगातील पहिली हमी असो. आज, एचसीव्ही ट्रकच्या नव्या ब्लेझो एक्स सीरिजमुळे आम्ही ‘हर चिज गॅरंटी के साथ’ या ग्राहकांसाठीच्या सेवेमध्ये वाढ केली आहे आणि कामगिरी व उत्पन्न या बाबतीत बेंचमार्क निर्माण करणार आहोत.”

वधेरा यांनी नमूद केले, “इंधनाचे वाढते दर विचारात घेता, अधिक मायलेजचा फायदा देणारे ब्लेझो एक्स सादर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. ब्लेझो एक्समुळे, या श्रेणीतील आघाडीची उत्पादने देण्याच्या व भारतीय सीव्ही उद्योगासाठी उच्च मापदंड निर्माण करण्याच्या महिंद्राच्या क्षमतेवरील ग्राहकांचा विश्वास दुणावेल, असा विश्वास आहे.”

महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या महिंद्रा ट्रक अँड बस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय यांनी सांगितले, “ब्लेझो एक्स दाखल झाल्यामुळे आमचे या क्षेत्रातील स्थान अधिक सक्षम होणार आहे. 21,000 ब्लेझो ट्रक भारतीय रस्त्यांवर धावत असून, पैशांचे योग्य मूल्य देणारा ब्रँड, सरस मायलेज व मालकीसाठी कमी खर्च असे फायदे देणारी एचसीव्हीची ब्लेझो रेंज कार कॅरिअर्स, टँकर्स, सिमेंट बल्कर्स व कोळसा उद्योग अशा महत्त्वाच्या श्रेणींसाठी अतिशय साजेशी आहे. आज, एमटीबी भारतातील सीव्ही क्षेत्रामध्ये अभेद्य ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत असून ती विशिष्ट श्रेणी व बाजार यामध्ये तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. आगामी काळात, एकंदर एचसीव्ही श्रेणीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची कंपनी, हे स्थान मिळवायचे आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!