
कोल्हापूर : २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईतील हॉटेल ताज वर दहशतवादी हल्ला झाला होता या घटनेला दहा वर्ष झाली आहेत या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी ,अन्य पोलिस व नागरिक यांना मानवंदना देण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच देशात शांतता राहावी म्हणून स्टॉप टेरेरिझम हा संदेश घेऊन कोल्हापूर मधील सहा वर्षीय केदार विजय साळुंखे हा चिमुकला मुलगा सांगली ते कोल्हापूर हे ५५ किलोमीटरचे अंतर स्केटिंग रॅलीद्वारे पूर्ण करणार आहे अशी माहिती ॲम्युचर कोल्हापूर रोलर स्केटिंग अॅकडमीचे प्रा .महेश कदम व अमोल कोरगावकर,स्वाती गायकवाड (साळुंखे) यांनी पत्रकार परिषदेत दिली .२६ नोव्हेंबर २०१८ रोजी केदार हा विश्वविक्रम करणार आहे .
या विक्रमाची नोंद एशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड ,नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि चाईल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (ग्लोबल) यामध्ये होणार आहे केदार विबग्योर हाय कोल्हापूर मध्ये शिक्षण घेत असीम तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळुंखे व पोलिस उपाधिक्षक स्वाती गायकवाड साळुंखे यांचा मुलगा आहे .
२६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ६.३० वाजता केदार हा सांगली येथील शहीद अशोक कामटे चौक विश्रामबाग येथून पोलीस अधीक्षक श्री.सुहेल शर्मा यांच्या उपस्थितीत आपल्या या स्केटिंग उपक्रमास सुरुवात करणार आहे आणि तो सकाळी १०.३० वाजता कोल्हापूर मधील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोहोचणार आहे केदार ५५ किलोमीटरचे हे अंतर चार तासात पूर्ण करणार आहे कोल्हापूर मध्ये आल्यानंतर त्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.विश्वास नांगरे पाटील,पोलीस अधीक्षक श्री.अभिनव देशपांडे,जिल्हाधिकारी श्री.अविनाश सुभेदार,महापौर सौ.शोभा बोन्द्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत केले जाणार असून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वतीने शहिदांना मानवंदना व श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे .याच वेळी त्याच्या या विश्वविक्रमाची नोंद होणार आहे आणि त्यानंतर त्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे .तरी केदारला अभिनंदन देण्यासाठी व शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी करवीरवासीयांनी याठिकाणी यावे असे आवाहन अनिल कदम अध्यक्ष माहिती ॲम्युचर कोल्हापूर रोलर स्केटिंग असोशिएशन यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
केदार हा अडीच वर्षाचा असल्यापासून स्केटिंगचे प्रशिक्षण राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण केंद्र येथे घेत आहे शिक्षक महेश कदम तेजस्विनी कदम व धनश्री कदम यांचे त्याला सहकार्य मिळत आहे त्यांनी आतापर्यंत १०५ किलोमीटर स्केटिंग रॅली कोल्हापूर ते अजनी सांगली पूर्ण केली आहे जी ५ किलोमीटर अंतराची लोकमत मॅरेथॉन त्याने पूर्ण केली आहे त्याने आतापर्यंत ४ गोल्ड मेडल ,६ सिल्वर मेडल आणि दोन ब्राँझ मेडल मिळवले आहे. या उपक्रास कोरगावकर ट्रस्ट, रग्गेडियन , यश फ़ाऊंडेशन DAG RIDERSयाचे सहकार्य लाभले आहे तसेच केदार चे स्वागत झालेनंतर कोरगावकर ट्रस्टच्या वतीने त्याचा सत्कार पोलिस गार्डन येथे करण्यात येणार आहे.यावेळी टी बालन यांची उपस्थिती होती.
Leave a Reply