
कोल्हापूर: गेल्या नऊ वर्षात शहराचा आमदार म्हणून व त्यापूर्वी पक्ष संघटनेत विविध पदावर काम करीत असताना सर्वसामान्य जनतेशी जुळलेली ‘नाळ’ आजही घट्ट आहे. याचा मनस्वी आनंद आहे. आंदोलन व विकासकामांच्या माध्यमातून जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करत गेलो. माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यावर कोल्हापूकरांनी भरभरून प्रेम केले. विश्वास दाखविला. हाच विश्वास आणि प्रेम मला काम करण्याची उर्मी देत राहिला. जनतेच्या पाठबळावर येत्या विधानसभेत विजयाची हॅट्रिक निश्चित असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आत्मविश्वापूर्वक स्पष्ट केले.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त शहर विकास, पक्ष संघटना, आंदोलन, भविष्यातील वाटचाल याबाबत दिलखुलास चर्चा केली. ते म्हणाले, शहरविकाससाठी आमदारपदाची कस लावली. टोल आंदोलनात सर्वसमान्यांनासोबत राहिलो. आंदोलनात सक्रिय राहू नये यासाठी आलेला खूप मोठा दबाव झुगारला. अखेर टोल पंचगंगेत बुडविला. लोकलढ्याला यश आले. यामध्ये मी अग्रभागी असल्याचे खूप मोठे समाधान आहे. महापालिकेत सत्ता नसल्याने अनेक विकासकामांना खो बसत असला तरी याची पर्वा न करता कोट्यावधींचा निधी खेचून आणला. वाहतुकीची कोंडी, कचराप्रश्न, महापालिकेच्या शाळा हे प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी रोड मॅप तयार आहे. पहिल्या टप्प्यात अंबाबाई विकास आराखड्याच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणता आला. टोलचा प्रश्न, थेट पाईपलाईन योजना मार्गी लावणे, शहराला जोडणारे सर्व रस्ते चौपदरी करणे, मैदानेबगीचे व ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, पंचगंगा प्रदूषण, आदी विषय प्रामुख्याने अजेंड्यावर आहेत. यातील अनेक प्रश्न तडीस गेले आहेत.
मागील आमदारकीच्या टर्ममध्ये विरोधी पक्षात काम करीत असताना निधी खेचून आणावा लागला. त्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तरीही गेल्या पाच वर्षात रस्ते, पाणी, आरोग्य, क्रीडा आदासाठी कोट्यवधीचा निधी अक्षरश: झगडून आणला. बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेना सत्तेत आली. कोल्हापूरला निधी आणण्यासाठी याचा उपयोग झाला. शिवसेनेकडे असलेल्या मंत्री पदांचा वापर शहरविकासासाठी उपयोग केला. उद्योग मंत्र्यांच्या प्रयत्नाने बेरोजगरांना नोकरी, लहान उद्योग उभारण्यासाठी मदत सुरू आहे. नुकत्याच झालेल्या बेरोजगार मेळाव्यात काही अंशी यश मिळाले. येत्या काळा अजून दोन मोठे रोजगार मेळावे घेणार आहे. शहरातील तरुणाईच्या हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे अंबाबाई व जोतिबाच्या माध्यमातून कोल्हापूरचा पर्यटन विकास करणे, तसेच कोल्हापूरला कृषी हब बनविणे हे दोन विषय अग्रक्रमाने अजेंड्यावर आहेत. त्यादृष्टीने अत्यंत सकारात्मक काम झाले आहे. विधानसभा अधिवेशनात कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर जोरदार व सात्यत्याने आवाज उठवत आलो आहे. अधिवेशनात कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळेच राजर्षी शाहू स्मारक, शाहू जन्मभूमी सुशोभीकरण, पंचगंगा प्रदूषण, टोल, थेट पाईपलाईन या या विषयांवर तत्कालीन सत्ताधान्यांना मी केलेल्या विधानसभेतील आंदोलनांमुळेच लक्ष देऊन निधीची तरतूद करावी लागली.
जगातील काही मोजक्या अतिप्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नदीचा समावेश होत आहे. ही बाब निश्चितच भूषणावह नाही. दररोज किमान १०० दशलक्ष लिटर दूषित व मेलामिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जात होते. त्यावर उपाय योजले. सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीसाठी राज्य शासनाला निधी देण्यास भाग पाडले. शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, लवकरच हे चित्र बदलेल. झूम येथील प्रकल्पातील कचऱ्यातील डोंगर हटलेले दिसतील. शासनाकडून त्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. कचरा उठाव व त्यावरील शास्त्रीय पध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे. बागा व मैदाने खेळण्यास योग्य नाहीत. हे सर्व चित्र बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सूरू आहेत. शहरवरासीयांना भेडसावणारे अनेक प्रश्न महापालिकेच्या अख्यात्यारीतील आहेत. महापालिकेत शिवसेनेची सत्ता नसल्याने या सोडविण्यात अडचणी येत असल्या तरी प्रशासनासोबत कायमपणे चर्चा करुन मार्ग काढण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आलो आहे. शहरविकसाचा ध्यास घेवून आंदोलन चळचळीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्यात यशस्वी झालो. कोल्हापूकरांनी माझ्यावर दाखविलेले प्रेम व विश्वासाला तडा जावू देणार नाही, येत्या निवडणुकीत पुन्हा विजयी होवून हॅट्रिक साधू असा विश्वास यानिमित्ताने आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरला शिवसेनेला मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. मला मंत्रीपद मिळाले असते तर याचा उपयोग शहर व जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासाठी अधिक चांगल्या प्रकारे करता आला असता. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना अधिक मजबूत करण्यात माझ्या मंत्री मंडळातील सहभाग मैलाचा दगड ठरला असता. जिल्ह्याने सहा आमदार देवूनही मंत्रीपदाने हुलकावनी दिल्याची खंत असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी बोलून दाखविले.
सतत पाठपुराव्यामुळे सीपीआरमध्ये सी.टी. स्कॅन मशीन, ट्रॅामा केअर सेंटर, आय.सी.यु. विभाग, ह्रुदय विभाग, मानसोपचार विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, स्वाईन फ्ल्यू साठी स्वतंत्र कक्ष आदी सुधारणा झाली. रुग्णालयास डिजिटल एक्स रे मशीन, लीथोस्त्रीप्सी मशीन, अफेर्सीस मशीन या अध्ययावत यंत्रणांनी रुग्णालय सुसज्ज केले. यासह मुंबई, पुणे सह कोल्हापूर शहरातील नामांकित रुग्णालयामध्ये आजतागायत सात हजारच्यावर रुग्णांवर हृदय, किडनी, कॅन्सर, मेंदू, लिव्हर आदी आजारावरील मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून सुमारे दोन हजारच्यावर रुग्णांना कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत केल्याचे आ. क्षीरसागर यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांत अखंड महाराष्ट्राच्या मागणी करिता सभागुहातील मानदंड उचलला. कोल्हापूर शहरातील जाचक टोल जाळले. टोलमुक्त कोल्हापूरसाठी सभागृहातील मानदंड उचलून निलंबन स्वीकारले. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी आमरण उपोषण
एलबीटीच्या आंदोलनातून व्यापाऱ्यांचे ३० कोटी रुपये वाचविले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मधील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी. यावर मुख्यमंत्री महोदयांकडून एस.आय.टी ची नेमणूक. कोल्हापुरात खंडपीठासाठी वेळोवेळी विधानभवनात आवाज. गोरगरिबांच्या सी.पी.आर रुग्णालयामध्ये सुधारणा करण्याकरिता अनेक वर्षे १५०० ते २००० रुपये पगारावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतनाचा लाभ मिळवून दिला.
श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याकरिता यशस्वी पाठपुरावा. श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमावे, पत्रकारांना पेन्शन मिळावी, मराठा समाजास आरक्षण मिळावे, अशी प्रमुख मागण्यासाठी वांरवार पाठपुरावा तर शिक्षण क्षेत्रात बालवाडी पासून उच्च शिक्षणापर्यंत दरवर्षी हजारो विध्यार्थ्याना विना डोनेशन प्रवेश. गेली १२ वर्षे डोनेशन विरोधातील मोर्चा काढून शिक्षण सम्राटांच्या जाचातून पालकांची सुटका. शहरातील ४० शाळांना मोफत संगणक वाटप. महानगरपालिका शाळांना नवसंजीवनी मिळावी यासाठी पाठपुरावा. दरवर्षी युवा सेनेच्या माध्यमातून गोरगरीब विध्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप. शहरातील विविध वाचनालायांना इमारत बांधकाम, अत्याधुनिक कपाटे, शैक्षणिक पुस्तक आदी करिता भरघोस मदत.
Leave a Reply