
कोल्हापूर : ऑल इंडिया रांकिंग टेनिस टूर्नामेंट मॅचेसच्या माध्यमातून ११ वर्षीय श्रेया देशपांडे हिने औरंगाबाद ,नागपूर, रायपूर( छत्तीसगड) आणि पाचगणी याठिकाणी झालेल्या टेनिस स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे. श्रेया देशपांडे हिने वयाच्या अवघ्या ५ वर्षी २६ गाड्या खालून लिंबू स्केटिंग करून विश्वविक्रम प्रस्थापित केला होता .याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. २०१२ मध्ये हिने हा स्केटिंग जा विश्वविक्रम केला होता .
आता ती पूर्णपणे टेनिस या खेळाकडे दीक्षित लक्ष केंद्रित करत आहे. ऑक्टोबर मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या टॅलेंट स्पर्धेमध्ये श्रेयाने १४ वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावले याच महिन्यात नागपूर मध्ये झालेल्या चॅम्पियन शिप स्पर्धेमध्ये १२ वर्षाखालील वयोगटात ती उपविजेती ठरली होती .शिवाय नोव्हेंबरमध्ये रायपुर (छत्तीसग) येथे झालेल्या टॅलेंट सिरीज स्पर्धेमध्ये १२ वर्षांखालील वयोगटात श्रेयाने विजेतेपद पटकावले व ती उपविजेती ठरली होती.
तसेच १४ वर्षाखालील वयोगटात झालेल्या दुहेरी स्पर्धेत तिने उपविजेतेपद पटकावले होते . पाचगणी येथे झालेल्या दुहेरी सिरीज स्पर्धेमध्ये ती विजेती ठरली होती.सध्या ती अकरा वर्षाची असून विभागीय क्रीडा संकुल येथे टेनिसचे प्रशिक्षण घेत आहे. श्रेया ही छत्रपती शाहू विद्यालयांची विद्यार्थिनी असून तिला महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनचे कौन्सिलर श्री. शितल भोसले तसेच प्रशिक्षक मेहुल केनिया, प्रकाश पाटील ,फिटनेस ट्रेनर कृनाल जांभळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे .यापुढेही टेनिस खेळाच्या माध्यमातून कोल्हापूरचे नाव अधिक उंचावर नेण्याची तिने इच्छा व्यक्त केली आहे .
Leave a Reply