
तगडी स्टारकास्ट, धम्माल विनोदी आणि भन्नाट मनोरंजनकरणाया ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या आगामी मराठीचित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई येथील फोरसिझन हॉटेलमध्ये थाटामाटात पार पडला. या दिमाखदारसोहळ्यात सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे,स्मिता शेवाळे, नीथा शेट्टी, राणी अग्रवाल संगीतकार पंकजपडघन,.कोरिओग्राफर उमेश जाधव, दिलीप मेस्त्री, एडिटरआशिष म्हात्रे, डिओपी समीर आठल्ये आदी मान्यवर उपस्थितहोते. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मिडीयांनी याचित्रपटातील संगीताला, गाण्यांना उत्तम प्रतिसाद दिला.
सहसा कोणत्याही प्रकाशन सोहळ्यात एखाद्या कलाकाराच्याहस्ते प्रकाशन केले जाते पण ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’च्यासंगीत प्रकाशन सोहळ्यात अनेकांना एक खास सरप्राईजमिळालं आणि ते सरप्राईज म्हणजे या चित्रपटाच्या संगीताचेप्रकाशन मराठीतील वरिष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांच्या हस्तेकरण्यात आले. आणि हा क्षण ठरला ‘सर्व लाईन व्यस्तआहेत’सोहळ्याचं वैशिष्ट्य.
प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत ‘ याचित्रपटाची निर्मिती स्टेलारीया स्टुडीयोची असून अमोल उतेकरयांनी प्रस्तुत केला आहे. नेहमीच वेगळी भूमिका साकारणारेमहेश मांजरेकर यांनी या चित्रपटात देखील एक वेगळी भूमिकासाकारली आहे.
या सोहळ्याला मिडीयाने जो भरभरुन प्रतिसाद दिलात्याविषयी व्यक्त होताना या चित्रपटाचे निर्माते अमोल उतेकरयांनी म्हटले की, “चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत मला या चित्रपटाविषयी जे अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्तचांगला प्रतिसाद मला मिळाला आहे. मी नेहमीच पॉझिटिव्हहोतो की मिडीया गाण्यांना चांगला प्रतिसाद देणार पणकालच्या सोहळ्यानंतर खरंच असं वाटतंय की मला जेअपेक्षित होत त्याहून जास्त चांगलं मला मिळालंय. आणियाचा मला आणि कलाकारांनाही फार आनंद झालाय.”
‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये ‘दिलाची तार’, गडबडे बाबा, ‘येक नंबर’, ‘तू मोरपंखी’ आणि ‘या रे या रे नाचू सारे’ अशीएकूण पाच गाणी आहेत. पंकज पडघन, उद्भव ओझा यांनी यागाण्यांना संगीत दिले आहे तर गायक आदर्श शिंदे, सौरभसाळुंखे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, मधुरा पाटकर, उद्भवओझा, सागर फडके, अंकिता ब्रम्हे आणि रागिणी कवठेकरयांनी ही गाणी गायली आहेत तसेच गीतकार श्रीकांत बोजेवार,वलय यांनी लिहिली आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवादगणेश पंडीत आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली आहेत.
स्टेलारीया स्टुडियोज प्रस्तुत ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ याचित्रपटाची कथा दिग्दर्शक प्रदिप मेस्त्री यांनी लिहिली असूनखुमासदार विनोदामुळे प्रेक्षकांचे पूरेपूरे मनोरंजन करणारा हाचित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारीलाप्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
Leave a Reply