
कोल्हापूर: सिध्दगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे अहमदाबाद बेंगलोर हैदराबाद मुंबई पुणे येथील राष्ट्रीय स्तरावरील कॅन्सर तज्ञांच्या मार्फत दिनांक 14 ते 16 डिसेंबर दरम्यान मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती काडसिद्धेश्वर महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ हा सर्वात जास्त कॅन्सरग्रस्त भाग आहे याची मी पदयात्रा केली याच पार्श्वभूमीवर या शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे असेही काडसिद्धेश्वर महाराज यांनी सांगितले. अत्यंत माफक दरात उत्कृष्ट व अत्याधुनिक सेवा देणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटलने गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी परंपरा जपत समाजातील सर्व दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. याचा आज हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे गरिबांचे हॉस्पिटल असा याचा लौकीक प्राप्त आहे. येथील कॅन्सर विभागामार्फत पाचशेहून अधिक अनेक गुंतागुंतीच्या मोठ्या कॅन्सर सर्जरी मोफत करण्यात आल्या आहेत. सुसज्ज केमोथेरेपी विभागामार्फत अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. आधुनिक पद्धतीने निदान व रोगाच्या प्राथमिक अवस्थेतील उपचार यामुळे कर्करोग पूर्ण बरा होऊ शकतो व आपण मृत्यू टाळू शकतो यासाठी जनजागृती व्हावी म्हणूनच हे निदान व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात निदान करण्यासाठी गरजू रुग्णांनी 10 डिसेंबर पर्यंत प्रत्यक्ष येऊन किंवा 0231-671775,687505 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस डॉ. रेशम रजपूत, डॉ. प्रमोद घाटगे, डॉ. प्रवीण नाईक उपस्थित होते.
Leave a Reply