मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाने सुरू केले एअरकंडीशनचे अद्वितीय शोरूम

 

कोल्हापूर:उत्तमश्रेणीच्या वातानुकूलन यंत्रांचे जगातील आघाडीचे उत्पादक  मित्सुबिशी इलेक्ट्रिक यांनी निवासी वापरासाठीच्या वातानुकूलन यंत्रांचे (एअर कंडिशनर्सचे) एक खास आणि अद्वितीय “संकल्पना शोरूम राजारामपुरी, कोल्हापूर  येथे सुरु केले आहे. 
या खास शोरूमचे नाव आहे एम ई क्यू- हिरोबा, ज्यात मित्सुबिशी इलेक्ट्रिकच्या उच्चआणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दर्जाच्या, टिकाऊ आणि तरीही माफक किमतीच्या उत्पादनांचे अनेक विविध प्रकार उपलब्धआहेत. मित्सुबिशी इलेक्ट्रिक क्वालिटी (एमई क्यू) हे उत्पादने, सेवा, भागीदारी, आणि लोकांच्या माध्यमातून दर्जा उत्तम राखण्याचे काम करते, जेणेकरून ग्राहकांना सर्वोत्तम सेवा मिळावी. हिरोबा या जपानी शब्दाचा अर्थ आहे लोकांना जाहीर ठिकाणी एकत्र येण्याची जागा, आणि एम ई क्यू हिरोबा ही अशी जागा असेल जिथे नवीन तंत्रज्ञानासंबंधी माहिती सगळ्यांना कळणार आहे.मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया (एम ईआय) चे संचालक आणि वातानुकूलनयंत्र विभागाचे व्यावसायीक प्रमुखअसलेले श्री योझो आयटो यांच्याम्हणण्यानुसार, “या एका खास प्रकारच्या शोरूम आहेत जिथे मित्सुबिशी इलेक्ट्रिक वातानुकूलन यंत्रांचे  प्रदर्शन आणि विक्री होईल जिथे ग्राहकांना ही उत्पादने प्रत्यक्ष हाताळून बघता येतील.  त्यामुळे मित्सुबिशी इलेक्ट्रिक या एका उच्च श्रेणीच्या वातानुकूलन यंत्रांच्या  ब्रॅण्डबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढेल. या खास शोरूम मध्येमित्सुबिशी इलेक्ट्रिक च्या उत्पादनांचे सगळे प्रकार असतील, ज्यात रूम एअर कंडिशनर्स,पॅकेज्ड एअर कंडिशनर्स, सिटी मल्टी वी आरएफ सिस्टिम्स आणि जेट टॉवेल्स यांचासमावेश होतो. ” श्री नीरज गुप्ता, वरिष्ठ महाप्रबंधक, लिविंगएंवीरोन्मेन्ट, मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडीया(एम ई आय) यांच्या म्हणण्यानुसार,” भारतातील अनेक ग्राहक आजही खरेदीकरण्याआधी वस्तू हाताळून बघणे पसंतकरतात. असे अनेक ग्राहक आहेत ज्यांनाखरेदी करताना कुणाचे तरी मार्गदर्शन हवेअसते. एम ई क्यू कूलिंग प्लॅनेट्स ही  अद्वितीय कल्पना आहे  कारण त्यामध्येग्राहकांना दुकानात जाऊन, उत्पादने नीटहाताळून, मग खरेदी करण्याचा निर्णय घेतायेतो. तर दुसरीकडे, एम ई क्यू हिरोबावातानुकूलन क्षेत्रातील सगळ्या आधुनिकतंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती ग्राहकांनादेते.

मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया (एम ईआय) विषयी:

शंभर वर्षांहून अधिक काळापासून  विश्वासार्ह आणि दर्जेदार उत्पादने देणारीमित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन(TOKYO:६५०३) ही कंपनी माहितीविश्लेषण संप्रेषण, अवकाश विज्ञान आणिउपग्रहाद्वारे संप्रेषण, ग्राहकोपयोगीइलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक तंत्रज्ञान, ऊर्जा,दळणवळण, आणि बांधकाम यंत्रसामुग्री यासगळ्यांना लागणाऱ्या इलेक्ट्रिकल आणिइलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामुग्रीचे उत्पादन, विक्रीआणि सेवा यामधील अव्वलदर्जाचीजगद्विख्यात कंपनी आहे. त्यांचे समूहघोषवाक्य ” चेंजेस फॉर द बेटर(चांगल्यासाठी बदल), आणि त्यांचेपर्यावरणीय घोषवाक्य, इको चेंजेस(पर्यावरणासाठी बदल), या दोन्हींमधूनमित्सुबिशी इलेक्ट्रिक एक जागतिक स्तरावरपर्यावरणाचे जतन करणारी आणितंत्रज्ञानाद्वारे समाजाला समृद्ध करणारीकंपनी बनण्याचे ध्येय बाळगून आहे. कंपनीने ३१ मार्च २०१८ मध्ये संपलेल्या आर्थिकवर्षात कंपनीच्या पूर्ण उद्योगसमूहाची एकूणविक्री ४,३३१.१ बिलियन येन (US$ ४१.८ बिलियन*) एवढी झाली होती.

मित्सुबिशी इलेक्ट्रिक ही भारतातीलग्राहकांना अनेक अभिनव आणि उच्चदर्जाची उत्पादने देण्यात आघाडीची कंपनीबनली आहे. त्यांच्या उत्पादनांमध्ये आणिसेवांमध्ये एअर कंडिशनर्स, फॅक्टरीऑटोमेशन, आणि इंडस्ट्रियल सिस्टिम्स, फोटोवोल्टाइक  सोल्युशन्स, सेमीकंडक्टर्सआणि तत्सम यंत्रे, दळणवळण सामुग्री,आणि व्हिजुअल आणि इमेजिंग यांचासमावेश होतो. :http://in.mitsubishielectric.com/en/index.page.अधिक माहितीसाठी यासंकेतस्थळाला भेट द्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!