
गगनबावडा: तालुक्यातील तळये आणि परिसरातील नागरिकांना उपयुक्त अशा सांस्कृतिक हॉलची निर्मिती या ठिकाणी होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सण-समारंभाची सोय झाली आहे, त्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. तळये येथे सांस्कृतिक हॉलच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.
गगनबावडा तालुक्यातील तळये येथे सांस्कृतिक हॉलची गरज असल्याची अपेक्षा ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. ही बाब लक्षात घेत खासदार धनंजय महाडिक यांनी साडेचार लाख रुपये देऊन, हॉलचे बांधकाम करण्याची सूचना केलीय. त्यानुसार या हॉलचा पायाभरणी समारंभ खासदार महाडिक यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला. हॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी दिल्याबद्दल खासदार महाडिक यांचा गावाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ए. बी. पाटीलसर, सिलोमन रेठरेकर, पंचायत समिती सदस्य आनंदा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी नियोजित हॉलमुळे परिसरातील नागरिकांना माफक दरात लग्न आणि इतर सण-समारंभ साजरे करता येतील, असे सांगितले. यावेळी तळयेच्या सरपंच प्रज्ञा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पडवळ, संपदा सुतार, सुवर्णा रासम, जरिना थोडगे, धुळाजी पाटील, जयसिंग पाटील, वसंत पाटील, अविनाश पाटील, विश्वास कांबळे, तुकाराम रासम, एम. जी. पाटील, नंदकुमार पोवार, संदीप पाटील, बाबूराव कोळेकर, रिंकू देसाई, राजू जाधव, युवराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a Reply