मधुमेंहीची औषधे कमी करण्यात फ्रीडम फ्रॉम डायबेटिस फौंडेशनचे यश

 

मुंबई : इंटरनॅशनल जर्नल ऑफ डायबेटिस अँड एंडोक्राइनोलॉजीच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये फ्रीडम फ्रॉम डायबेटिस रिसर्च फौंडेशनचा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. हा शोधनिबंध जीवनशैलीतील बदलांमुळे टाईप 2 मधुमेहींना झालेले फायदे या विषयावर आहे.यामध्ये विशेषत: वनस्पतींवर आधारित आहारविषयक बदल आणि गुरुत्वाकर्षण विरोधी व्यायाम याविषयी माहिती दिली गेली आहे. फ्रीडम फ्रॉम डायबेटिसच्या संशोधन विभागाच्या 2.5 वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर हे यश प्राप्त झाले आहे आणि हा अशा प्रकारे भारतातून प्रकाशित झालेला पहिलाच पेपर असू शकतो,ज्यामध्ये मधुमेहाचे पुनरूत्थान करण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती प्रकाशित करण्यात आली आहे,जी मधुमेहासाठी / मधुमेहींसाठी उपयुक्त ठरेल.

वनस्पतींवर आधारित आहार शैलीतील बदल आणि गुरूत्वाकर्षणाच्या विरूध्द दिशेने केलेल्या व्यायामामुळे टाईप 2 मधुमेहींमध्ये घडलेल्या बदलांची चाचणी घेण्यात आली. त्यांनी 10-14 आठवड्यांच्या कालावधीत नियमितपणे या जीवनशैलीतील बदल अंगिकारले आणि त्यामुळे त्यांची रक्तशर्करेचे (ग्लाइसेमिक) नियंत्रण सुधारले आणि मधुमेहावरील औषधोपचारांची आवश्यकता कमी झाली.या आश्‍चर्यकारक सुरूवातीमुळे फ्रीडम फ्रॉम डायबेटिस चे आणखी 2 माहितीपूर्वक शोधनिबंध प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. डायबेटिस रिव्हर्स होण्याची शक्यता आहे,असा विश्‍वास आम्ही जगाला सिध्द करून देऊ इच्छितो,असे मत फ्रीडम फ्रॉम डायबेटिस रिसर्च फौंडेशनचे संस्थापक डॉ.प्रमोद त्रिपाठी यांनी व्यक्त केले.फ्रीडम फ्रॉम डायबेटिस (एफएफडी) ही एक संस्था आहे ज्यांची डायबेटिस रिव्हर्सलमध्ये खासियत आहे आणि निरोगी कुटुंबाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न आणि जनजागरूकतेचे काम चालू ठेवतो.त्यांनी एक अद्वितीय दृष्टीकोन विकसित केला आहे ज्यामध्ये आहार,व्यायाम,आंतरिक परिवर्तन आणि औषधोपचार अशा चार-स्तरांवर काम करणारी ही संस्था आहे.ह्या प्रोटोकॉल मुले,फ्रीडम फ्रॉम डायबेटिस आजच्या तारखेला 5000 हून अधिक लोकांची डायबेटिसची औषधे आणि 1000 हून अधिक लोकांचे इन्शुलिन बंद करण्यात यश प्राप्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!