
आमदार निधी खाजगी लेआउटला खर्च झाला आहे, असा आरोप करणाऱ्या सत्यजित कदम (घोसाळकर) यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे. शिवसेना – भाजप युती होणार नाही असे गृहीत धरून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजप कडून आमदारकी लढवायची अशी अपेक्षा सत्यजित कदम बाळगून होते. परंतु, दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून युती बाबत होत असलेली सकारात्मक वक्तव्ये किंवा युती न झाल्यास पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी दुसराच उमेदवार भाजप कडून जाहीर केलेल्या उमेदवारी मुळे सत्यजित कदम यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून, वैफल्यातून असे बिनबुडाचे आरोप करीत सुटले आहेत.
*गेल्या ९ वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोट्यावधींचा निधी आणून शहर विकासाचे काम त्याच जोरावर पुन्हा विजयाच्या हॅट्रीक साठी सज्ज…*
वास्तविक पाहता गेली ९ वर्षे शहराचा लोकप्रतिनिधी या नात्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना शहरात ठिकठिकाणी बसविलेले कोट्यावधी रुपयांचे ओपन जिम, गेम झोन, तालीम संस्थांना बांधकाम निधी, व्यायाम साहित्य, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, शहरातील खेळाडूंसाठी मल्टीस्पोर्ट्स मैदाने, रस्ते गटारी यांच्यासाठी भरघोस निधी वितरीत केला आहे. यासह राजाराम बंधाऱ्याकरिता रु. १७ कोटींचा निधी, एस.टी.पी. प्लांट करिता रु. १०९ कोटींचा निधी, आमरण उपोषणाने मंजूर झालेली थेट पाईप लाईन योजना, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा, शहर विकास प्राधिकरण योजना, पर्यायी पुलाचे बांधकाम, सीपीआर मधील ट्रॉमा केअर साठी रु. ६ कोटी व सिटी स्कॅन साठी रु.६ कोटी याद्वारे सुसज्ज झालेले सीपीआर आदी प्रश्न माझ्या पाठपुराव्या प्रसंगी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यामुळे मार्गी लागले आहेत. गेली ९ वर्षे या विकासकामांसह आंदोलन आणि चळवळीच्या माध्यमातून शहर विकासाचे काम करीत असल्याने, अस्तित्व जपण्यासाठी वाटेल ते आणि बिनबुडाचे आरोप सत्यजित कदम (घोसाळकर) यांच्याकडून होत आहेत. या खोट्या आरोपांविरोधात मी सत्यजित कदम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
*आमदार निधीसाठी आमदार शिफारस करतात.. निधी मंजुरीचे काम मा.जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने होते…*
*माहितीच्या अभावाने सत्यजित कदमांनी केलेल्या बालीश वक्तव्यांची कीव येते…*
निवडणूक जवळ आली कि पावसाळ्यात उगविणाऱ्या छत्र्याप्रमाणे असे खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळवायची असे बिनकामी उद्योग करण्यात सत्यजित कदम घोसाळकर माहीर आहेत. पण गेली ९ वर्षे आमदार म्हणून काम करताना विकास कामांच्या जोरावर आणि कोल्हापूर शहरवासीयांच्या पाठबळावर शहर विकासाच्या कामात मी कुठेही कमी पडलेलो नाही.
आमदार स्थानिक विकास निधी हा जिल्हा नियोजन समितीचे सचिव मा. जिल्हाधिकारी यांच्या सहीने मंजूर होतो. आमदारांनी सही केल्यावर हा निधी वितरीत होतो असा काही भाग नाही. आमदारांनी सुचविलेली कामे मंजूर करून निधी वितरीत करण्याचे अधिकार नियोजन समितीला आहेत. ज्या भागातून नागरिकांच्या मागण्या येतात त्या भागांना प्राधान्याने या निधीचे वितरण करून तेथील विकासकामे प्राधान्याने केली जातात. ज्या कदमवाडी प्रभागातून सत्यजित कदम नेतृत्व करीत आहेत त्याच भागातील नागरिकांनी माझ्याकडे निधी मागणी केली. ज्या भागातील नागरिकांची मागणी अर्ज येतात त्यांच्या मागणीनुसार मी माझ्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा नियोजन विभागास पत्र देवून सदर विकास कामासाठी शिफारस करतो. यानंतर जिल्हा नियोजन समितीमार्फत या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले जाते. यासह माझा मतदारसंघ हा कोल्हापूर महानगरपालिकेशी निगडीत असल्याने कोल्हापूर महानगरपालिकेकडून या विकासकामाचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात येते. त्यानंतर या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होवून त्यावर कंत्राटदार नेमला जातो. या सर्व कामावर सार्वजनिक विभागाचे पूर्ण लक्ष असल्याने यामध्ये घोटाळा किंवा भ्रष्टाचार होऊ शकत नाही
Ml
Leave a Reply